NMC Ward Committee Appointments- प्रभाग समित्यांवर नेमणार १८ अशासकीय सदस्य

डिसेंबरअखेर नियुक्त्या; प्रत्येक प्रभाग समितीवर तीन जण राहणार
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाल्यानंतर आता प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडणार असून, डिसेंबरअखेर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी महिन्यात प्रत्येक प्रभाग समितीवर तीन याप्रमाणे एकूण १८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

राज्य शासनाने प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे. प्रभाग समित्यांमध्ये बिगरसरकारी संस्था तसेच समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यासाठी सन २००० मध्ये नियमावली निश्चित करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमागील मुख्य उद्देश राजकारणविरहित पद्धतीने नागरिकांचे प्रश्न आणि स्थानिक समस्यांना प्रभाग समित्यांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. नियमावलीनुसार अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करताना संबंधित संस्थेची पात्रता, संस्थेचे कार्य आणि सदस्य नामनिर्देशनाची पद्धत निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार, विभागीय अधिकारी इच्छुक संस्थांच्या अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारांच्या नावांचा अंतिम प्रस्ताव तयार करतील. अर्जदारांच्या पात्रतेबाबत अभिप्रायासह सर्व अर्ज संबंधित प्रभाग समितीतील निवडून आलेल्या नगरसेवकांसमोर ठेवले जातील.

Nashik Municipal Corporation
Nashik Traffic Challan 20 Percent Discount |अद्याप वसूल न झालेल्या वाहतूक ई-चलनांच्या दंडाच्या रकमेत २० टक्के सवलत मिळणार

त्यानंतर नगरसेवकांकडून अशासकीय संस्थांच्या प्रतिनिर्धीचे नामनिर्देशन करण्यात येईल, नामनिर्देशनाबाबत झाल्यास नगरसेवक बहुमताच्या आधारे सदस्यांची निवड करतील. त्यामुळे जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष नियुक्त्या होण्याची शक्यता असून, प्रभाग समित्यांमध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना काम करण्याची संधी मिळणार आहे.

Nashik Municipal Corporation
6 Nashik Teachers State Award | नाशिकच्या ६ शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार

अशासकीय सदस्य नियुक्तीचे निकष

उमेदवार संबंधित अशासकीय संस्थेचा सदस्य असणे आवश्यक.

संस्थेची अधिकृत नोंदणी झालेली असावी.

संस्थेचे सलग तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे.

लेखा विवरणपत्र आणि कामाचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेला असावा.

नगरपालिकांच्या कामकाजाशी संबंधित किमान एक प्रकल्प संस्थेने राबविलेला असावा.

उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसावा.

उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत नसावा

दुधाची तहान ताकावर

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून सर्वच पक्षांत मोठी रस्सीखेच दिसून आली. विशेषतः या पदासाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या भाजपमध्ये तर नाराजी नाट्यही घडले. सत्ताधाऱ्यांमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादंग माजले असताना विरोधी पक्षातील उबाठा-काँग्रेस आघाडीही यावरूनच दुभंगली. आता स्वीकृत नगरसेवकपद न मिळालेल्यांचा प्रभाग समित्यांच्या अशासकीय पदांवर डोळा आहे. दुधाची तहान ताकावर भागविण्याचा हा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.