Nashik Municipal Corporation : रणसंग्राम सुरू; कोठे आणि कसा भरणार अर्ज ? पहा एका Click वर..

अडीच हजार इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार
नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणूक रणसंग्रामाला अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवार (दि. २३) पासून प्रारंभ होत आहे. ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष असे सुमारे अडीच हजार इच्छूक निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. निवडणुकीसाठी दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या कार्यालयात अर्ज वाटप व स्वीकृतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने नाशिकसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. त्यानुसार १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणीद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्दीनंतर आता मंगळवार (दि.२३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत आहे.

नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation
Nashik Politics : नाशिकमध्ये उबाठा- मनसे युती निश्चित

२३ ते २९ डिसेंबर या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ व ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेवारी अर्ज भरता येणार आहे. ३० जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असणार आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.

इच्छुकांना या ठिकाणी भरता येणार अर्ज

  • प्रभाग क्रमांक १, २ व ३ साठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे पंचवटी विभागीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर

  • प्रभाग ४, ५ व ६ करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे पंचवटी विभागीय कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर

  • प्रभाग ७, १२ व २४ करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे यांच्याकडे नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय

  • प्रभाग १३, १४ व १५ करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा सह.जिल्हा निबंधक संदीप आहेर यांच्याकडे नाशिक पूर्व विभागीय कार्यालय मेनरोड

  • प्रभाग १६, २३ व ३० करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे मुंबई नाका येथील अटल दिव्यांग भवनात

  • प्रभाग १७, १८ व १९ करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांच्याकडे नाशिकरोड विभागीय कार्यालयात

  • प्रभाग २०, २१ व २२ करीता निवडणूक निर्णय अधिकिारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे नाशिकरोड विभागीय कायालयात

  • प्रभाग २५, २६ व २८ करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे यांच्याकडे नवीन नाशिक विभागीय कार्यालय

  • प्रभाग २७, २९ व ३१ करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. जी.बी.एस. पवनदत्ता यांच्याकडे नवीन नाशिक विभागीय कार्यालयात

  • प्रभाग ८, ९, १० व ११ करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे सातपूर विभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation : महापालिकांचे निकालही आश्चर्यकारक असतील! कोणाचा दावा ?

असा भरा उमेदवारी अर्ज

  • ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे त्या प्रभागाचा क्रमांक व जागा क्रमांक व असल्यास आरक्षण स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक.

  • उमेदवार, प्रस्तावक व अनुमोदक यांचे नाव ज्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये आहे त्या प्रभागाचा अनुक्रमांक व मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

  • सर्व अपक्ष उमेदवारांनी तीन चिन्हांची निवड करणे आवश्यक आहे.

  • बंधपत्रे/ कर्जरोखे/ भाग यांते मूल्य सूचीतील कंपन्यंच्या बाबतीत शेअर बाजारामधील सध्याच्या बाजारभाव मूल्यानुसार व सूचीबाह्य कंपन्यांच्या बाबतीत पुस्तकी मुल्यानुसार देण्यात यावे.

  • जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा.

  • अवलंबित म्हणजे उमेदवाराच्या मिळकतीवर सारत: अवलंबून असलेली व्यक्ती.

  • नामनिर्देशन पत्रासोबतच्या शपथपत्रामधील कोणत्याही रकान्यातील माहिती न भरल्यास अथवा रिक्त जागा ठेवल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार नामनिर्देशपत्र नाकारण्यास पात्र होऊ शकते.

  • प्रत्येक पानावर उमेदवाराची स्वाक्षरी असावी.

  • पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या जोडपत्र १ व व जोडपत्र २ वर पक्षाचे अध्यक्ष, सचिव अथवा अशक्ष सूची पाठविण्यास अधिकृत केलेल्या पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्याची स्वाक्षरी असावी.

    Nashik Latest News

उमेदवारी अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक

  • राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियम २०००च्या तरतुदींना अनुसरून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्राची सत्यप्रत सोबत जोडावी. * नामनिर्देशनपत्राच्या छानीच्या वेळी पडताळणीसाठी मूळ जाती प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करावे. अथवा जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा जोडावा.

  • नाशिक महापालिकेचा थकबाकीदार नसल्याबाबत दाखला.

  • शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र/ स्वयं घोषणापत्र.

  • अलिकडील काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.

  • निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत.

उमेदवारी अर्ज ५० तर माहिती पुस्तिका १५० रूपयात

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज ५० रुपयात तर निवडणुकीसंदर्भात इत्यंभूत माहिती असलेली माहिती पुस्तिका १५० रुपयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असणार आहे. उमेदवारी अर्ज तब्बल ४३ पानांचा आहे. आवश्यक ती सर्व माहिती अर्जात भरणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

पक्षनिहाय इच्छूकांची संख्या

  • भाजप - १०६७

  • शिवसेना (शिंदे गट)- ३५०

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- २२५

  • शिवसेना(उबाठा)- २५०

  • राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)- २४२

  • काँग्रेस- २५०

  • इतर - ४२५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news