Nashik Municipal Corporation | स्थायी समितीवर भाजपचेच वर्चस्व

Nashik Municipal Corporation | महापालिकेची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सोमवारी (दि.१६) विशेष महासभेत घोषित केली.
Nashik Municipal Election
Nashik Municipal ElectionPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सोमवारी (दि.१६) विशेष महासभेत घोषित केली. शिवसेना (शिंदे गट) व मनसे शहर विकास आघाडीमुळे तौलनिक संख्याबळात झालेल्या बदलातून स्थायी समितीतील भाजपचा एक सदस्य कमी झाला असला तरी या समितीवर सर्वाधिक नऊ सदस्य नियुक्तीतून भाजपचे वर्चस्व मात्र कायम राहिले आहे.

Nashik Municipal Election
Nashik Outer Ring Road | रिंग रोड भूसंपादनातील शेतकऱ्यांचे प्रश्न कायम

शिवसेना- मनसे शहर विकास आघाडीचे चार, शिवसेना (उबाठा) चे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य स्थायी समितीवर गेला आहे. महापौर-उपमहापौर निवडीनंतर ६ फेब्रुवारीला तहकूब झालेली विशेष महासभा सोमवारी (दि.१६) महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.

महापालिका निवडणूक निकालानंतर राजकीय पक्षांच्या गटनोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे महापौर- उपमहापौर निवडीच्या सभेपर्यंत राजकीय पक्षांचे तौलनिक संख्याबळ निश्चित झालेले नसल्याने स्थायी सदस्य नियुक्ती प्रक्रिया सर्वानुमते तहकूब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुदतीअंती संख्याबळ निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या गटनेत्यांकडून स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी बंद लखोट्यात नावे महापौरांकडे सादर करण्यात आली होती. गटनेत्यांकडून प्राप्त पत्रांचे वाचन नगरसचिवांकडून महासभेत करण्यात आले. त्यानंतर महापौर आहेर-आडके यांनी स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नावे घोषित केली.

सर्व नवनियुक्त स्थायी समिती सदस्यांचा महापौर-उपमहापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संख्याबळानुसार स्थायी समितीत भाजपचे दहा सदस्य नियुक्त होणे अपेक्षित होते. परंतु शिवसेना (शिंदे गटा) ने मनसेच्या एका सदस्याला बरोबर घेत शहर विकास आघाडीच्या नावे गटनोंदणी केल्याने स्थायीतील राजकीय पक्षांच्या संख्याबळाचा कोटा बदलला.

त्यामुळे भाजपची एक जागा कमी होऊन शहर विकास आघाडीला मिळाली आहे. शिवसेना (उबाठा) व काँग्रेसनेदेखील एकत्र गटनोंदणी केली असली तरी स्थायी समिती सदस्य नियुक्तीत त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा मनसेला फायदा झाला असून, पहिल्याच वर्षी स्थायी समिती सदस्यपदावर मयूरी पवार यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही अपक्ष मुकेश शहाणे यांना स्थायीवर संधी देण्यात आली आहे.

कोणाला मिळतो लाभ?

महापौरपदी हिमगौरी आहेर-आडके यांच्या निवडीनंतर नाशिक महापालिकेत महिला राज अवतरले आहे. आता स्थायी समिती सदस्य नियुक्ती प्रक्रियेतून या महिला राजला बळ प्राप्त झाले आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत ११ महिला नगरसेवकांची नियुक्ती झाली आहे. उर्वरित पाच सदस्य हे पुरुष आहेत. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा महिला राज अधोरेखित झाले आहे.

Nashik Municipal Election
Kapurthala Memorial Nashik | गोदाघाटावरील कपूरथळा स्मारकाला नवीन झळाळी

पदासाठी रस्सीखेच

या समितीच्या सभापतिपदासाठी स्थायी समिती सदस्य नियुक्तीनंतर आता रस्सीखेच रंगणार आहे. या समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यात शिवसेना (शिदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटाचादेखील भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे सभापती भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. सभापतिपदासाठी मच्छिंद्र सानप, माधुरी बोलकर, दीपाली कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत.

स्थायीवरील पक्षनिहाय नूतन सदस

भाजप : माधुरी बोलकर, मच्छिंद्र सानप, दीपाली कुलकर्णी, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, इंदुबाई खेल सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, अदिती पांडे.

शिवसेना (शिंदे गट): मनसे आघाडी मयूरी पवार किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे,

शिवसेना (उबाठा) काँग्रेस आघाडी: भारती ताजन योगेश गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुकेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news