Nashik Municipal Corporation | स्थायी सभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक

Nashik Municipal Corporation | मच्छिंद्र सानप, माधुरी बोलकर, दीपाली कुलकर्णी यांची नावे चर्चेत
Nashik Municipal Corporation Election / नाशिक महानगरपालिका निवडणूक
Nashik Municipal Corporation Election / नाशिक महानगरपालिका निवडणूकPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी येत्या बुधवारी (दि. २५) निवडणूक होत आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद असणार आहेत.

Nashik Municipal Corporation Election / नाशिक महानगरपालिका निवडणूक
Dona Paula Jetty Goa | पतीशी भांडण अन् टोकाचं पाऊल; गोव्याच्या दोनापावला जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

स्थायी समितीवर सत्तारूढ भाजपचे वर्चस्व असल्यामुळे सभापती भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. सभापतिपदासाठी भाजपतर्फे मच्छिंद्र सानप, माधुरी बोलकर, दीपाली कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर पक्षाकडून केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या सोमवारी (दि.१६) महापौर हिमगौरी आहेर व उपमहापौर विलास शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती झाली. त्यात भाजपचे ९, शिवसेना शिंदे गटाचे ४, शिवसेना उबाठाचे २ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून एक सदस्य नियुक्त केला गेला. त्यानंतर नगरसचिव विभागाने आयुक्तांमार्फत सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार डॉ. गेडाम यांनी बुधवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलवली आहे. या समितीवर भाजपचे १६ पैकी ९ सदस्य आहेत. त्यात शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटाचा देखील भाजपला पाठिंबा राहणार आहे.

त्यामुळे सभापती भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. सभापतिपदासाठी मच्छिंद्र सानप, माधुरी बोलकर, दीपाली कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, ऐनवेळी भाजपकडून धकातंत्राचाही वापर होण्याची शक्यता असल्याने सभापती निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Nashik Municipal Corporation Election / नाशिक महानगरपालिका निवडणूक
Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेचा 'मेगा प्लॅन'

बिनविरोध निवड शक्य

भाजपचे स्पष्ट बहुमत आणि त्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा यामुळे महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. भाजपकडे स्थायीत ९, शिंदे गटाकडे ४ तर राष्ट्रवादीचा १ सदस्य आहे.

त्यामुळे १६ पैकी १३ सदस्य भाजप उमेदवाराच्या बाजूला असणार. त्यात राष्ट्रवादीचाही भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ १४ पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अवघ्या दोन सदस्यांच्या बळावर उवाठाकडून निवडणूक लढली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे सभापतिपद बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news