Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेचा 'मेगा प्लॅन'

Nashik Kumbh Mela 2027 | साधुग्रामसह भाविक मार्गांच्या स्वच्छतेसाठी नेमणार ८९६४ कंत्राटी सफाई कर्मचारी
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : आसिफ सय्यद

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंत, भाविकांसह नाशिककरांच्या आरोग्यरक्षणाची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. मनुष्यबळाअभावी शहर स्वच्छतेचे आउटसोर्सिंग करणाऱ्या महापालिकेने सिंहस्थातील साफसफाईच्या कामाचे देखील आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Bhujbal vs Pawar : मंत्री भुजबळांनी रोहित पवारांच्या दाव्याची उडवली खिल्ली, म्हणाले; ‘विलीनीकरणापूर्वीच कोणत्या पदावर कोण हे..’

तब्बल ८९६४ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याची जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. सिहस्थकाळात स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

सद्यःस्थितीत नाशिक शहरात घंटागाड्यांद्वारे प्रतिदिन सरासरी ७५९ मे. टन कचरा गोळा केला जातो. सिंहस्थकाळात शहरातील कचऱ्याचे प्रमाण प्रतिदिन ८५० मे, टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तपोवनात अंदाजित चार लाख साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी तब्बल एक हजार एकर जागेवर साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे.

या साधुग्रामधून प्रतिदिन सुमारे १४५ मे. टन कचऱ्याची निर्मिती होईल. अशाप्रकारे सिंहस्थकाळात नागरिक, भाविकांच्या माध्यमातून तसेच साधुग्रामधून सुमारे एक हजार मे. टन कचऱ्याची निर्मिती होणार आहे. या कचऱ्याचे संकलन व खतप्रकल्पावर वाहतुकीसाठी तब्बल २८.३७कोटींचा खर्च केला जाणार आहे.

सिंहस्थकाळात स्वच्छतेसाठी महापालिकेकडील मनुष्यबळ अपुरे पडणार असल्याने कंत्राटी तत्त्वावर ८९६४ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात साधुग्राम परिसरात तीन सत्रांत स्वच्छतेसाठी ४००० साधुग्राममधील शौचालयांच्या साफसफाईसाठी १३९४, साधुग्राममधील स्नानगृह साफसफार्ससाठी ११६०, रामकुंड, शाहीमार्ग, होळकर पूल ते तपोवन गोदाघाट स्वच्छतेसाठी ७२०, उर्वरित कर्मचाऱ्यांची भाविक मार्गाच्या स्वच्छतेसाठी नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी ९१.६३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सिंहस्थात स्वच्छतेवर १७९ कोटींचा खर्च

गत सिंहस्थात स्वच्छतेवर १२.८१ कोटींचा खर्च करण्यात आला होता. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची संख्या कित्येक पटीने वाढणार असल्याची शक्यता गृहीत धरण स्वच्छतेच्या कामांसाठी १७९.४६ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यात बाह्य मनुष्यबळामार्फत साफसफाईसाठी ९१.६३ कोटींच्या खर्चासह फिरते शौचालय व स्नानगृह पुरवण्यासाठी ४७. ३५ कोटी, केरकचरा संकलन व वाहतुकीसाठी २८.३७कोटी, स्वच्छतेसाठी वाहन व यंत्रसामग्री ५.५० कोटी, १५० लिटर्स क्षमतेचे डस्टबिन खरेदीसाठी २.७० कोटी, श्री व्हील बरोज १.८० कोटी, निर्माल्य कलश ६० लाख, जंतुनाशकते ८६ लाख, हार्डवेअर व बोहरीवाण यासाठी ६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Fraud Case | बहुचर्चित पिटीसी समोरील जागेच्या फाइल्स संदर्भात गुन्हा दाखल

खतप्रकल्पाचे विस्तारीकरण करणार

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारे भाविक तसेच नाशिक शहराची वाढती लोकसंख्या लक्षात कचऱ्याच्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेतर्फे अस्तित्वातील खतप्रकल्पाचा देखील विस्तार केला जाणार आहे.

यासाठी खतप्रकल्पालगतची २३ एकर आरक्षित जागा आरक्षित केली जाणार आहे. या प्रक्रियेला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news