Nashik Politics 2026 | स्थायी, स्वीकृत सदस्यांसाठी सोमवारी विशेष महासभा

Nashik Politics 2026 | निवडीकडे लक्ष : नियुक्ती करताना एकत्रित गुणांकन ठरणार महत्त्वाचे
Nashik Municipal Election
Nashik MunicipalPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगरपालिकेत सुरू असलेली प्रशासकीय नुकतीच महापौर, उपमहापौर यांच्या निवडीनंतर संपुष्टात आली आहे. आता स्थायी समिती सदस्य व स्वीकृत सदस्य निवडीसाठी येत्या सोमवारी (दि. १६) विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे.

Nashik Municipal Election
Pudhari Anniversary Nashik | स्नेहमिलन सोहळ्यात 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव

विभाभीय आयुक्तांकडे पक्षांकडून स्वतंत्र नोंदणीऐवजी दोन शहर विकास आघाडी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदस्यांची नियुक्ती करताना एकत्रित गुणांकन करून सदस्य निवड केली जाणार आहे.

नाशिक महानगरपालिकेत भाजपने शिवसेना शिंदे गटाला बरोबर घेतले आहे. तरी शिवसेना व मनसे आघाडीची नोंदणी झाल्याने भाजपच्या गुणांकनात घट झाली आहे. त्यामुळे स्थायीत दहा ऐवजी नऊ सदस्य भाजपचे जातील, असे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच महापौर, उपमहापौरांची निवड झाली असून, आता महत्त्वाचे पद असलेल्या स्थायी समिती सदस्यांची निवड होणार असल्याचे याकडे लक्ष लागले आहे. येत्या सोमवारी यासाठी विशेष महासभा होणार असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या स्वीकृतवर टाच यंदा नाशिक महापालिकेच्या सभागृहात दहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.

सर्वधिक सदस्य संख्या असलेल्या भाजपचा विचार केल्यास त्यांचे ७२ सदस्य आहेत. यामुळे भाजपचे सर्वाधिक सहा सदस्य स्वीकृत होतील. त्यानंतर शिवसेना व मनसेचे दोन स्वीकृत जातील, तर उबाठा व काँग्रेसने शहर विकास आघाडी म्हणून १८ सदस्य असल्याने त्यांचे गुणांक १.४७ होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा गुणांक ०.३२ आहे. आघाडीचा गुणांक राष्ट्रवादीपेक्षा अधिक म्हणजे ०.४७ असल्याने आघाडीचे दोन स्वीकृत सदस्य होतील.

उबाठा, काँग्रेसचे एकूण १८ सदस्य संख्या

महानगरपालिकेत शिवसेनेचे २६ सदस्य आहेत. त्यांनी मनसेने सोबत गटनोंदणी करून शहर विकास आघाडीची नोंद केली आहे. त्यामुळे गट म्हणून त्यांची संख्या २७ इतकी आहे. तर शिवसेना उबाठा पक्षाने काँग्रेसच्या तीन सदस्यांना सोबत घेत शहर विकास आघाडीची नोंदणी केली आहे. त्यामुळे उबाठाचे १५ व काँग्रेसचे तीन असे एकूण १८ सदस्य त्यांचे आहेत. त्यामुळे शिवसेना-मनसेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते, तर उबाठा - काँग्रेसच्या गटनेतेपदी केशव पोरजे यांचे निर्णय अंतिम मानावे लागणार आहेत

Nashik Municipal Election
Ghost Viral Video: भूतानं पोलिसांनाही कामाला लावलं; गावात रात्रीच्या वेळी नेमकं काय घडतंय?

डॉ. पाटील यांची तांत्रिक अडचण

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत. त्यात राष्ट्रवादीने एकमेव अपक्ष मुकेश शहाणे यांना सोबत घेत आघाडी तयार केली. मात्र, गटनेतेपदाच्या वादामुळे डॉ. हेमलता पाटील यांनी स्वतंत्र नोंदणी केली. राष्ट्रवादी-अपक्ष आघाडी गटनेतेपदी सीमा रंजन ठाकरे, तर अपक्षांसह चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी स्वतंत्र नोंदणी केल्याने त्यांचे नाव राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीत समाविष्ट नाही. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news