Ganeshotsav Mandal Permission |गणेशोत्सव मंडपासाठी महिनाभर आधी परवानगी बंधनकारक

Ganeshotsav Mandal Permission | मनपाची नियमावली : विनापरवाना उभारणीवर कारवाईचा इशारा
Ganesh Mandal Electricity
Ganesh Mandal Electricity AI IMAGE
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपातील मंडप, स्टेज व कमानी उभारण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. संबंधित मंडळे, संस्था व आयोजकांनी उत्सवाच्या किमान ३० दिवस आधी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ganesh Mandal Electricity
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील 123 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कायम सेवेचा मार्ग मोकळा!

महाराष्ट्र मनपा अधिनियमानुसार उच्च न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच महापालिकेच्या ७ जुलै २०२० रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार सार्वजनिक रस्ता अथवा सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज व कमानी उभारण्यासाठी संबंधित पोलिस विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या अधीन राहून ऑनलाइन परवानगी दिली जाणार आहे.

यासाठी आयोजकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. उत्सव किंवा कार्यक्रमाच्या तारखेच्या सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

Ganesh Mandal Electricity
Nashik Farmer Loan | शेतकरी कर्जमाफीनंतरही नाशिक जिल्हा बँकेची कोंडी कायम; अपेक्षित निधी न मिळाल्याने पेच!

परवानगी मिळाल्यानंतर मंडप, स्टेज किंवा कमान उभारणे तसेच मनपाने दिलेल्या परवानगीची प्रत किंवा परवानगी क्रमांक संबंधित रचनेच्या दर्शनी भागावर स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक राहणार आहे.


विनापरवाना किंवा परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून उभारण्यात आलेले मंडप, स्टेज अथवा कमानी अनधिकृत समजून महाराष्ट्र मनपा अधिनियमानुसार हटवण्याची तसेच आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर सार्वजनिक सण-उत्सवांसाठी मंडप, स्टेज व कमानी उभारण्यापूर्वी विहित मुदतीत ऑनलाइन परवानगी घेऊनच उभारणी करावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news