Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चौकशीत 690 नोंदींमध्ये फेरफार उघड

Nashik Municipal Corporation | महापालिकेतर्फे चौकशी सुरू; 15,689 दाखल्यांची तपासणी पूर्ण
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या फेरफार प्रकरणाच्या चौकशीत आतापर्यंत १५ हजार ६८९ दाखल्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १४ हजार २६९ नोंदी ऑनलाइन पोर्टलवर जशाच्या तशा आढळल्या आहेत, तर ६९० नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात 'अमृत स्नान' कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

यामध्ये ५४७ दाखल्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे, तर १४३ दाखल्यांमध्ये किरकोळ स्वरूपाचे बदल झाल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली. अद्याप ७३० दाखल्यांची तपासणी बाकी आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिक महापालिका हद्दीतील जन्मदाखल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. गेल्या काही वर्षांत १८ जन्मदाखल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे निदर्शनास आणून देत, त्यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत, सखोल चौकशीची मागणी केली होती.

त्यानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विभागीय स्तरावर सहा चौकशी समित्या नियुक्त केल्या होत्या. या समित्यांमार्फत सन २०१६ पूर्वीच्या जन्म-मृत्यू दाखल्यांची तपासणी सुरू करण्यात आली. प्रत्येक समितीत विभागीय अधिकारी, विभागीय वैद्यकीय अधिकारी, तीन वैद्यकीय अधिकारी आणि तीन बहुउद्देशीय सेवकांचा समावेश आहे.

730 दाखल्यांची तपासणी अद्याप बाकी

चौकशीदरम्यान आढळलेल्या ६९० बदलांपैकी ५४७ नोंदींमध्ये गंभीर स्वरूपाचे, तर १४३ नोंदीमध्ये किरकोळ स्वरूपाचे फेरफार झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. उर्वरित दाखल्यांची तपासणी पूर्ण करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णयाची शक्यता आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik | नाशिक कारागृहामधील भ्रष्टाचार अन् सुरक्षेतील त्रुटी !

सन २०१६ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी सीआरएस प्रणाली लागू केली. मात्र, नाशिक महापालिकेत ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसल्यामुळे ऑफलाइन दाखल्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

मुंबईतही ८७ हजार दाखल्यांमध्ये बदल झाल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, महापालिकेच्या चौकशी समित्यांनी आतापर्यंत १५ हजार ६८९ दाखल्यांची पडताळणी पूर्ण केली आहे. त्यापैकी १४ हजार २६९ नोंदी जशाच्या तशा असल्याचे आढळले, तर ६९० नोंदीमध्ये बदल झाल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news