Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कामांत दिरंगाई; आणखी तीन ठेकेदारांना नोटिसा

Nashik Kumbh Mela 2027 | प्रतिदिन १० हजारांचा दंड; सात जणांवर कारवाई
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू वे असलेल्या विकासकामांमध्ये विलंबरराविरोधात करणाय्या बांधकाम महापालिकेच्या विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी चार न ठेकेदारांना दंडात्मक नोटिसा न बजावल्यानंतर सोमवारी (दि.१५) न आणखी तीन ठेकेदारांवर कारवाई करत न त्यांना प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड न आकारण्याची नोटीस देण्यात आली आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Municipal Corporation |"30 मेपर्यंत रस्ते दुरुस्ती पूर्ण करा, अन्यथा..."; रस्ते दुरुस्तीसाठी अल्टिमेटम

सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविक तसेच साधू-महंतांच्या सुविधांच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणांमार्फत विकासकामे सुरू आहेत. महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, ती मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

या रस्ते कामांवर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नियमित देखरेख ठेवली जात आहे. मात्र काही रस्ते प्रकल्पांमध्ये अपेक्षित गतीने कामे होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ८ जून रोजी चार ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Municipal Corporation Road | चार ठेकेदारांना महापालिकेचा दणका

त्यानंतर सोमवारी स्वस्तिक इन्फ्रा लिमिटेड, एम. टी. पाटील कन्स्ट्रक्शन आणि पवार-पाटकर कन्स्ट्रक्शन कंपनी या तीन ठेकेदारांना नव्याने नोटिसा देण्यात आल्या. स्वस्तिक इन्फ्रा लिमिटेडकडे दोन रस्त्यांची कामे असल्याने संबंधित कंपनीवर प्रतिदिन २० हजार रुपयांच्या दंडाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

सिंहस्थाची सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सातत्याने कामांचा आढावा घेतला जात आहे. काही ठिकाणी कामात विलंब आढळून आल्याने आणखी तीन ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली आहे.

- संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news