Nashik Municipal Corporation Road | चार ठेकेदारांना महापालिकेचा दणका

Nashik Municipal Corporation Road | सिंहस्थ कामांना विलंब केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कामांना विलंब करणाऱ्या चार ठेकेदारांना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दणका दिला आहे. एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीला प्रतिदिन ९१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर अन्य तीन ठेकेदारांना प्रतिदिन १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहेत.

Nashik Municipal Corporation
Tender scam : जलसंपदात तक्रारींचा पाऊस, कारवाईचा दुष्काळ

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय यंत्रणांमार्फत भाविक तसेच साधू-महंतांच्या सुविधेसाठी विविध कामे केली जात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत या रस्ते कामांवर नियंत्रण ठेवले जात आहे आहे.

विहित कालावधीत ही कामे पूर्ण होण्यासाठी कामांचे टप्पे ठरवून देण्यात आले असून, त्यानुसार कामांची प्रगती तपासली जात आहे. त्रयस्थ संस्थेमार्फतही या कामांचा दर्जा तपासला जात आहे. काही कामे निर्धारित गतीनुसार सुरू आहेत. काही रस्त्यांच्या कामांना विलंब होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शास आले आहे. त्यामुळे रस्ते कामांना विलंब करणाऱ्या चार ठेकेदारांना बांधकाम विभागाने नोटिसा बजावत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

Nashik Municipal Corporation
Sambhajinagar News : ठराविक कंत्राटदारांनाच बहुतांश कामे

एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीला अंबड लिंकरोडचे काम देण्यात आले आहे. या कामात विलंब होत असल्याने ९१ हजार रुपये प्रतिदिन या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिंडोरी रोडच्या कामातही विलंब होत असल्याने दंडात्मक कारवाईची नोटीस ठेकेदाराला देण्यात आली आहे.

मखमलाबाद रोडच्या कामात गती नसल्याचे आढळून आल्याने महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदारावरही १० हजार रुपये प्रतिदिन दंडात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय अन्य दोन मक्तेदारांवर प्रतिदिन १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news