Nashik Municipal Corporation Election 2026 Results : नाशिकमध्ये 'कमळ' फुलले! भाजपची एकहाती सत्ता, पाहा संपूर्ण निकाल
Nashik Municipal Corporation Election 2026 Results Live Updates
नाशिक : पावणेचार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपचे ११८ पैकी ७२ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीत भाजपने रस न दाखवल्याने शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एकत्र येत युती केली होती. यामध्ये शिंदे गटाचे २६ तर राष्ट्रवादीचे ५ उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने महाविकास आघाडी करत भाजपसमोर उभे केलेले आव्हान मात्र फोल ठरले. शिवसेना ठाकरे गटाला १४, काँग्रेसला ३, तर मनसेला १ जागा मिळाली.
निकालावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
महापालिकेच्या निकालावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "72 चा आकडा माझ्यापर्यंत आला आहे. 10 ते 15 जागा आमच्या हातच्या गेल्या. बहुमत भाजपला मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रात आम्ही महायुतीत होतो.
नाशिकमध्ये भाजप ६७, शिंदे शिवसेना २४ तर ठाकरे सेना ८ जागांवर विजयी
एकुण जागा- १२२
भाजप विजयी - ६७
शिंदेंची शिवसेना विजयी - २४
ठाकरेंची शिवसेना - ०८
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - ०३
काँग्रेस - ०३
मनसे - ०१
अपक्ष - ०१
आघाडीवर
भाजप - ०९
शिंदेंची शिवसेना - ०५
ठाकरेंची शिवसेना - ०१
ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी, आणि पत्नी माधवी सूर्यवंशी पराभूत झाले.
प्रभाग क्रमांक 28 मध्ये दोन शिंदेंच्या सेनेचे आणि दोन भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे दीपक दातीर, सुवर्णा मटाले, भाजपचे शरद फडोळ, प्रतिभा पवार विजयी झाल्या.
प्रभाग १३ मध्ये मनसेचा विजय
बहुचर्चित प्रभाग १३ मध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या पत्नी मयुरी पवार विजयी झाल्या आहेत.
भाजप ६०, शिंदे शिवसेना ३७ तर ठाकरे सेना १२ जागांवर विजयी
एकुण जागा - 122
भाजप - 60
शिंदेंची शिवसेना - 37
ठाकरेंची शिवसेना - 12
राष्ट्रवादी अजित पवार - 3
कोंग्रेस - 3
मनसे - 01
प्रभाग 31 मध्ये वैशाली विनोद दळवी विजयी
भाजप ४८, शिंदे शिवसेना १८ तर ठाकरे सेनेची ६ जागांवर विजयी
एकुण जागा- १२२
भाजप विजयी - 48
शिंदेंची शिवसेना विजयी - 18
ठाकरेंची शिवसेना - 6
राष्ट्रवादी अजित पवार - 3
कोंग्रेस -3
मनसे - 02
प्रभाग क्रमांक २६
शिवसेना शिंदे गटाचे निवृत्ती इंगोले, भागवत आरोटे, हर्षदा गायकर, नयना जाधव, विजयी
भाजप ११, शिंदे शिवसेना ८ तर ठाकरे सेनेची २ जागांवर आघाडी
एकुण जागा- 122
भाजप विजयी - 11
शिंदेंची शिवसेना विजयी - 8
ठाकरेंची शिवसेना - 1
प्रभाग १५- भाजपच्या मिलिंद भालेराव अर्चना थोरात आणि सचिन मराठी यांची विजयाकडे वाटचाल
प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपचे सुधाकर बडगुजर विजयी
अ - सुधाकर बडगुजर - 13579 ( भाजप विजयी )
ब - साधना मटाले 9183 ( भाजप विजयी )
क - कविता नाईक 9981 ( शिंदे गट विजयी )
ड - मुरलीधर भामरे - 6436 ( उबाठा विजयी )
प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार जवळपास ५०० हून अधिक मतांनी आघाडीवर
पहिला निकाल हाती, शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार मुसंडी
पहिला निकाल हाती आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने खातं उघडल असून ४ जागांवर विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे विजयी झाल्या आहेत. या प्रभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
नाशिकमध्ये भाजप ९, शिंदे शिवसेना ७, ठाकरे सेना ४ तर राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडी
पहिल्या फेरीअखेर प्रभाग क्रमांक १४ मधून कोण आघाडीवर?
प्रभाग 14 (पहिली फेरी)
अ : जागृती गांगुर्डे (रा. अजित): 909 (245 मतांनी पुढे)
दिगबरं नाडे (काँग्रेस): 664
संजय साबळे(रा. शरद पवार) : 389
ब :
नझीया अत्तार (काँग्रेस) : 708
समीना मेमन (रा. शरद) : 268
बुशरा शेख (रा. अजित पवार) : 820
कस्तुरी हिरवे (अपक्ष ) : 863(43 मतांनी पुढे )
क :
समिया खान (काँग्रेस) 761 (112 मतांनी पुढे )
रुपाली डहांके (शिंदेसेना) 649
शबाना पठाण (अजित पवार)583
ड :
सुफी जीन(काँग्रेस) 1142(670 मतांनी पुढे )
मुजाहीद हाजी (रा. शरद पवार ) 472
अल्फान हाश्मी (अजित पवार ) 419
प्रभाग क्रमांक 29 मधून पहिल्या फेरी अखेर भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश आघाडीवर
पहिला फेरी
मुकेश शहाणे - १६२१
दीपक बडगुजर - ७८९
पहिल्या फेरीत प्रभाग 15 मधून कोण आघाडीवर?
प्रभाग : 15 पहिली फेरी
अ :
प्रथमेश गिते (उबाठा) 691
मिलिंद भालेराव (भाजप) 1213 (522 मतांनी पुढे)
ब :
राहत काजी (रा. अजित पवार ) 49
अर्चना थोरात (भाजप) 1178 (492 मतांनी पुढे )
सीमा पवार (उबाठा) 686
क :
सचिन मराठे (भाजप) 1270 (799 मतांनी पुढे)
गुलजार कोकणी (उबाठा) 471
प्रभाग 14 मधून जागृती गांगुर्डे आघाडीवर
अ- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागृती गांगुर्डे - 245 मतांनी आघाडीवर
ब - अपक्ष कस्तुरी हिरवे - 43 मतांनी आघाडीवर
क - काँग्रेसच्या सामिया खान - 112 मतांनी आघाडीवर
ड - काँग्रेसचे सुफी जीन 670 मतांनी आघाडीवर
प्रभाग ५ क मध्ये आशा पाटील यांनी मारली बाजी
प्रभाग क्रमांक पाच क मध्ये भाजपच्या आशा रमेश पाटील विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये पहिल्या फेरीतील आकडेवारी
अ : रश्मी भोसले(शिंदेसेना) : 1296 ( 601 मतांनी पुढे )
वत्सला खैरे (काँग्रेस) : 326
अदिती पांडे (भाजपा) : 695
ब : मयुरी पवार (मनसे) 641
सुवर्णा मोरे (शिंदेसेना) 836
हितेश वाघ (भाजप) 873 ( 37 मतांनी पुढे )
क : संजय चव्हाण (उबाठा) 475
दीपक डोके (शिंदेसेना) 508
राहुल शेलार (भाजप) 1029( 521 मतांनी पुढे )
ड : गणेश मोरे (शिंदेसेना) : 1296 (539 मतांनी पुढे)
शाहू खैरे(भाजप) 757
जयेश बर्वे (उबाठा) 247
आतापर्यंतची आकडेवारी
नाशिक महानगरपालिका -
एकुण जागा- १२२
नाशिक एकूण कल - ३०
भाजप - १२
शिंदेंची शिवसेना - ०७
राष्ट्रवादी अजित पवार - ०३
ठाकरेंची शिवसेना - ०३
काँग्रेस -
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार - ०१
आरपीआय - ०१
इतर - ०२
प्रभाग क्रमांक २५ मधील टपाली मतदान
अ गट भाजपा सुधाकर बडगुजर ६३
शिंदे शिवसेना अतुल सानप १५
ब गट भाजपा साधना मटाले ५१
शिंदे शिवसेना शोभना शिंदे २१
क गंट शिवसेना शिंदे कविता नाईक ३८
भाजपा पुरस्कृतभाग्यश्री ढोमसे ३२
ड गट उबाठा मुरलीधर भामरे ३६
शिंदे शिवसेनाअनिल मटाले १९
भाजपा पुरस्कृत प्रकाश अमृतकर १७
प्रभाग २४: प्रवीण तिदेम आघाडीवर
प्रभाग १५ : भाजपचे सचिन मराठे, अर्चना थोरात, मिलिंद भालेराव आघाडीवर
टपाली मतदानात भाजपचे ६ उमेदवार आघाडीवर
एकुण जागा- १२२
पोस्टल मतदान आघाडी
भाजप - ०६
शिंदेंची शिवसेना - ०४
राष्ट्रवादी अजित पवार - ०१
ठाकरेंची शिवसेना - ०१
काँग्रेस -
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार गट - ०१
आरपीआय - ०१
इतर - ०१
टपाली मतादानात कोण आघाडीवर?
प्रभाग क्रमांक २९ मधून टपाली मतादानात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर
प्रभाग २५ मध्ये टपाली मतदानात भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर
प्रभाग ८ मधून शिंदे सेनेचे विलास शिंदे टपाली मतदानात आघाडीवर
प्रभाग ९ मधून भाजप उमेदवार दिनकर पाटील अमोल पाटील आघाडीवर
प्रभाग क्रमांक ११ मधून टपाली मतदानमध्ये दिशा लोंढे आघाडीवर
प्रभाग १३ मध्ये गणेश मोरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर शाहू खैरे पिछाडीवर
प्रभाग २० मध्ये हेमंत गायकवाड, अश्विनी पवार, गायत्री गाडेकर, योगिता गायकवाड आघाडीवर
प्रभाग १४ मध्ये सुफियान जीन आघाडीवर. सुरेश दलोड दुसऱ्या क्रमांकावर
प्रभाग क्रमांक २५ मध्ये टपाली मतदानात भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर
टपाली मतमोजणीला सुरवात झाली आहे. 122 जागांसाठी टपाली मोजणी केली जात आहे.
पुन्हा कमळ फुलणार की परिवर्तन
महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान झाले आहे. ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतमोजणीतून निकाल जाहीर केला जाणार आहे. नाशिकमध्ये पुन्हा कमळ फुलते की परिवर्तन घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र आणि राज्यातील सत्तेत महायुती असली तरी महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवत १२२ पैकी ११८ ठिकाणी उमेदवार निवडणूक रिंगणात उरवले. मात्र, एबी फॉर्मच्या गोंधळात भाजपला तीन अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. महायुतीत भाजपने रस न दाखवल्याने शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एकत्र येत युती केली. दुसरीकडे शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानेही महाविकास आघाडी करत भाजपसमोर आव्हान उभे केल होते. या निवडणुकीतील ७३५ उमेदवारांपैकी ५२७ उमेदवार राजकीय पक्षांचे तर उर्वरित २०८ उमेदवार अपक्ष निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. त्यामुळे मतदारांनी आता कुणाला कौल दिला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. त्यामुळे हा निकाल केवळ उमेदवारांसाठीच नाही, तर नेत्यांसाठीही प्रतिष्ठेचा मानला जात आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आमदार चित्रा वाघ, शिवसेना शिंदे गटातर्फे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, दादा भुसे, हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेनेतर्फे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, मनसेतर्फे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये सभा घेत निवडणुकीचा फड गाजवला.
विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकून '१०० पार'चा नारा दिला आहे, तर दुसरीकडे दादा भुसे आणि समीर भुजबळ यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

