Nashik Water Cut | नाशिकला पाणीकपातीचे संकेत

Nashik Water Cut | २० टक्क्यांपर्यंत कपातीचा प्रस्ताव; महापौर, आयुक्तांसह गटनेत्यांच्या बैठकीत होणार निर्णय
Nashik Water Supply
Nashik Water Supply pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबल्याने आणि पर्जन्यमान घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिल्यानंतर मुंबई-पुण्यापाठोपाठ नाशिक महापालिकेनेही पाणीकपातीची तयारी सुरू केली आहे.

Nashik Water Supply
Pune Water Supply: कमी पावसाच्या अंदाजामुळे पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता

सध्या नाशिक महापालिकेकडे १२ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून, उर्वरित १८ दिवसांचा तुटवडा टक्के ११.४ २५.०२ भरून काढण्यासाठी १५ ते २० टक्के पाणीकपात किंवा गंगापूर धरणातील अतिरिक्त पाणी वापरासाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबतचा अंतिम निर्णय महापौर, चर खोदण्याच्या पर्यायाचीही तपासणी अल निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे, तर मुंबईत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेही कपातीचे संकेत दिले आहेत.

याबाबत महापौर, आयुक्त, उपमहापौरांसह गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाच्या मते, गंगापूर धरणातील अतिरिक्त सुमारे ६०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी चर खोदण्याचा पर्यायही तपासला जात आहे. मात्र हा पर्याय व्यवहार्य ठरला नाही तर पाणीकपात अटळ मानली जात आहे. आयुक्त, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

नाशिक शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने गंगापूर धरणावर अवलंबून असून, शहराच्या एकूण गरजेपैकी सुमारे ७५ टक्के पाणी गंगापूर धरणातून मिळते. याशिवाय मुकणे आणि दारणा धरणांमधूनही पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेने ऑक्टोबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीसाठी ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने ती मंजूर केली असली तरी आता हेच आरक्षण जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

सध्या शहराला दररोज सुमारे ६०० दशलक्ष लिटर अर्थात २१ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जात आहे. १३ जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशात अल निनोमुळे यंदा पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे धरणांतील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, सिंचनासाठी पाणी सोडण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Nashik Water Supply
Bhiwandi Water Crisis: भिवंडीत ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

चर खोदण्याच्या पर्यायाचीही तपासणी

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे, तर मुंबईत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेही कपातीचे संकेत दिले आहेत. याबाबत महापौर, आयुक्त, उपमहापौरांसह गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाच्या मते, गंगापूर धरणातील अतिरिक्त सुमारे ६०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी चर खोदण्याचा पर्यायही तपासला जात आहे. मात्र हा पर्याय व्यवहार्य ठरला नाही तर पाणीकपात अटळ मानली जात आहे.

जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांशी चर्चा करून लवकरच पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news