Nashik NMC Engineers Promotion | मनपातील अभियंत्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

Nashik NMC Engineers Promotion | दोन कार्यकारी अभियंते, दोन उपअभियंत्यांना मिळणार बढती
Nashik NMC Engineers Promotion
Nashik NMC Engineers Promotion
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेतील अभियांत्रिकी (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या कर्मचारी निवड समितीने पात्र अधिकाऱ्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अभियंत्यांना दिलासा मिळाला आहे.

Nashik NMC Engineers Promotion
BMC Promotion : पालिकेतील कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारल्यास २ वर्षां पदोन्नती अपात्र

महानगरपालिका सेवा नियम २०२३ मधील तरतुदींनुसार शैक्षणिक अर्हता, सेवाज्येष्ठता, मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवरील विभागीय चौकशी आदी बाबींची सविस्तर पडताळणी करून ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

स्थापत्य विभागातील पदवीधारक संवर्गातील कार्यकारी अभियंता पदाच्या रिक्त जागांसाठी कर्मचारी निवड समितीने दोन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आहे. यामध्ये नीलेश दत्तात्रय साळी आणि राजेश गोपाळराव पालवे यांचा समावेश आहे.

दरम्यान, नितीन सुभाष राजपूत यांचे नाव पात्रतेच्या निकषांमध्ये असले तरी उपलब्ध पद नसल्यामुळे त्यांना सध्या पदोन्नती देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थापत्य विभागातील पदवीधारक उपअभियंता संवर्गातील रिक्त पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपातील पदोन्नतीसाठी बालाजी नामदेवराव सूर्यकर आणि दत्तात्रय श्रीरंग कोल्हे यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

या पदासाठी पंकज अरुण बापते यांचे नाव प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. तर पद उपलब्ध नसल्यामुळे संजय अरुण गावीत, सुभाष काळूराम बहिरम आणि प्रवीण लक्ष्मीकांत थोरात यांना सध्या पदोन्नती प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.

Nashik NMC Engineers Promotion
Parbhani News : जिल्हा परिषदेत नियमबाह्य पदोन्नती, सात वर्षांनंतर लघुटंकलेखक पदोन्नती रद्द

महासभेच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय

कर्मचारी निवड समितीची बैठक २४ जून २०२६ रोजी पार पडली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांची उपस्थिती होती.

समितीने तयार केलेल्या इतिवृत्ताला आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर आता हा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. महासभेची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे अंतिम आदेश जारी केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news