Nashik Municipal Corporation | स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची आज घोषणा

Nashik Municipal Corporation | सातव्या जागेसाठी भाजपचा अट्टहास कायम; चेंडू महापौरांच्या कोर्टात
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्तीचा अखेरचा टप्पा शुक्रवारी (दि. २०) पार पडणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार असून, प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या १० नावांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपमधील एका गटाने काँग्रेसच्या नाराज नगरसेवकांना हाताशी धरत सातव्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी आग्रह कायम ठेवल्याने नियुक्तीचा पेच कायम आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik TCS Case : नाशिक 'टीसीएस' प्रकरणी 'एमआयएम' नेते इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

उबाठाने मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. महापौर या राजकीय आणि कायदेशीर पेचातून कसा मार्ग काढतात, याकडे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या १० जागांची नियुक्ती प्रक्रिया नऊ महिन्यांपासून रखडली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

उबाठाचे गटनेते केशव पोरजे, 'स्वीकृत'चे उमेदवार हेमंतकुमार गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. उबाठाच्या वतीने अॅड. विनोद महाडिक यांनी काँग्रेसचे नगरसेवक सुफियान जीन आणि भाजपचे सुनील आडके यांनाही नोटीस बजावल्याने या नियुक्ती प्रक्रियेला कायदेशीर वळण मिळाले आहे.

दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या महासभेत प्रशासनाने नियमानुसार संबंधित गटनेत्यांनी सुचवलेल्या १० सदस्यांचीच नावे नियुक्तीसाठी सादर केली आहेत. मात्र, काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या 'कथित' पाठिंब्याच्या आधारे उबाठाच्या एका उमेदवाराचे नाव वगळून भाजपचे सुनील आडके यांना सातव्या जागेवर संधी द्यावी, यासाठी भाजपमधील एका गटाकडून दबाव आणला जात आहे. प्रशासनाने नियमांचा आधार घेत या मागणीला नकार दिला आहे.

त्यामुळे नियुक्तीचा चेंडू आता महापौरांच्या कोर्टात आहे. वाद न्यायालयात जाण्याची शक्यता उबाठाचा एक उमेदवार वगळून सातवा सदस्य नियुक्त करण्याचा भाजपमधील एका गटाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावात बदल करण्यास नकार दिल्याने महापौरांच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

प्रशासनाच्या प्रस्तावाविरोधात निर्णय घेतल्यास स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यातच उबाठाने आधीच कॅव्हेट दाखल केल्याने न्यायालयीन हस्तक्षेपाची शक्यता आहे. सातव्या सदस्याच्या नियुक्तीचा कायदेशीर पेच लक्षात घेता भाजप सध्या बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे.

'या' १० नावांची नियुक्ती प्रस्तावित

भाजप: अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव. शिवसेना (शिंदे गट) : सूर्यकांत लवटे, बाबूराव आढाव. उबाठा : हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.