Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ रस्त्यांना आता 'डेडलाईन'चा बूस्टर!

Nashik Simhastha Kumbh Mela | ३० कामांसाठी आयुक्तांचा ॲक्शन प्लॅन
Nashik News
Nashik Newsfile photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने सिंहस्थासाठी मंजूर करण्यात आलेल्या ३० रस्त्यांच्या कामांवर आता लक्ष केंद्रित केले आहे. मार्च २०२७ पर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी सद्यस्थितीत केवळ ३५ ते ४० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी अधिकाऱ्यांना कामांचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

Nashik News
President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर होणार महत्त्वाचे 'डी-ब्रीफिंग'

अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी दररोज कामांचा आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर भाविक आणि साधू-महंतांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांमार्फत सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.

महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १ हजार २३० कोटी रुपये खर्चून २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन रस्त्यांना मंजुरी मिळाल्यामुळे आता सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये खर्चाची ३० रस्त्यांची कामे सुरू आहेत. या सर्व कामांसाठी ठेकेदारांना मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कामांवर देखरेख ठेवली जात असून, प्रत्येक कामाचे टप्पे निश्चित करून, त्यानुसार प्रगती तपासली जात आहे. तसेच त्रयस्थ संस्थेमार्फत कामांच्या गुणवत्तेची पडताळणी केली जात आहे. मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या घाईत गुणवत्तेशी तडजोड होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. याप्रकरणी काही ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीमुळे त्यात महापालिका प्रशासनाचा बराचसा वेळ खर्च झाला. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र आहे. ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत, रस्तेकामांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले. निर्धारित मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Nashik News
President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर होणार महत्त्वाचे 'डी-ब्रीफिंग'

द्वारका - दत्त मंदिर रस्त्याबाबत आज बैठक

शहरातील ३० रस्त्यांच्या कामांबरोबरच द्वारका ते दत्तमंदिर या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या सहापदरीकरणाचाही प्रश्न मार्गी लावण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. या प्रकल्पासाठी २२१ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एन्र्हाई) या रस्त्याच्या ९० टक्के लांबीचा भाग अतिक्रमणमुक्त करण्याची अट घातली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त खत्री यांनी मंगळवारी (दि. ३) संबंधित ठेकेदार आणि NHAI च्या अधिकाऱ्यांची बैठक બોલાवली आहे. बैठकीनंतर कार्यआरंभ आदेश देऊन दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर आता सिंहस्थासाठी मंजूर करण्यात आलेल्या ३० रस्त्यांच्या कामांवर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. मार्च २०२७ पूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. द्वारका - दत्तमंदिर रस्त्याचे कामही तातडीने सुरू करण्यात येणार असून, सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल.

— मनिषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.