नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरण थेट जलवाहिनीच्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे सिद्धार्थनगर येथे शनिवारी (दि. १२) शिफां गोरे या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याच्या ठपका ठेवत 'जिंदाल' या ठेकेदारावर कंत्राटदार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे तसेच उपठेकेदारांना या प्रकरणात सहआरोपी करण्याचे आदेश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बुधवारी (दि. १६) महासभेत दिले.
मृत गोरे यांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भरपाई देण्याचे जाहीर करतानाच मृताची पत्नी मनीषा गोरे यांना महापालिकेत मानधनावर रुजू करून घेण्याचा निर्णयदेखील महापौरांनी जाहीर केला. प्रकल्प सल्लागार कंपनीकडून कामांमधील देखरेखीची जबाबदारी काटेकोरपणे पाळली जात नसल्याने सर्व सल्लागार कंपन्यांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महापौर आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या महासभेत सिद्धार्थनगर येथील अपघात प्रकरणावर भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे, शिवसेना (शिंदे गट) गटनेते अजय बोरस्ते, 'उबाठा' गटनेते केशव पोराजे व राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या सीमा ताजणे यांनी दाखल केलेल्या लक्षवेधीवर वादळी चर्चा झाली.
कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना न करता ठेकेदाराने लोखंडी पाईप रस्त्यात आडवा करून रस्ता बंद केल्यामुळेच गोरे यांना दुर्दैवी अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर तसेच उपठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई मिळावी. मृताच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा.
मृताच्या पत्नीला महापालिकेत मानधनावर नोकरी मिळावी अशी मागणी नगरसेवकांनी आक्रमकपणे मांडत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. गुरुदेव शहाणे यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली, तर ठेकेदारावर गुन्हा दाखल न झाल्यास पुढील महासभा चालू न देण्याचा इशारा पोरजे यांनी दिला. ठेकेदारासह उपठेकेदारावर कारवाईची मागणी सुधाकर बडगुजर, राहुल दिवे, दिनकर पाटील, भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे यांनी केली. नाशिककरांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महापौरांनी केली.
मृताच्या कुटुंबीयांना न्यायालय निर्देशानुसार भरपाई देणार.
मृताची पत्नी मनीषा गोरे यांना मनपात मानधनावर नोकरी.
मृताच्या मुलांच्या शिक्षण खर्चाची जबाबदारी ठेकेदारावर.
प्रकल्प सल्लागार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार.
नगरसेवकांचे मानधनातून भरपाई निधी कोष स्थापनार.
सेवा संकल्प योजनेतून जयश्रीच्या उपचाराचा खर्च उचलणार.
खड्डे न बुजवल्याबद्दल पंचवटीतील ठेकेदार नायर यांना काळ्या यादीत टाकणार.
गंगापूर धरण थेट जलवाहिनीच्या कामाची मूळ मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत होती. काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली गेली. त्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने ठेकेदारावर १ ते १५ मे पर्यंत प्रतिदिन एक लाख रुपये, तर १६ मे पासून अडीच लाख रुपये प्रतिदिन दंड ठोठावण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दराडे यांनी महासभेला दिली. करारातील मुदतीत हे काम पूर्ण झाले असते तर अपघात झाला नसता, अशी कबुली आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गंगापूर धरण थेट जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ९९९ कोटी शासनाने मंजूर केले. आतापर्यंत ९३८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, प्रशासकीय राजवटीत लोकनियुक्त मंडळ नसल्यामुळे शासनाने उर्वरित निधी देण्यास नकार दिला. आता लोकनियुक्त सभा स्थापन झाल्यानंतरही निधी दिला जात नाही. त्यामुळे ६० कोटींचा निधी शासनाकडे अडकल्याचा गौप्यस्फोट आयुक्त खत्री यांनी महासभेत केला.
नाशिक रोड भागातील अधिकारांविरोधात लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना उबाठा गटनेते केशव पोराजे यांनी सिद्धार्थनगर अपघात प्रकरणी चर्चा करण्याची आग्रही मागणी करत थेट व्यासपीठावर अध्यक्षांना न विचारता भाषण केल्याने महापौर आहेर-आडके व पोराजे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. लक्षवेधीवरील चर्चा पूर्ण होऊ देण्याची सूचना करत पोराजे यांना शांत बसण्याची सूचना महापौरांनी केली. मात्र, त्यावर आक्रमक भाषण कारवाई करावी की करू नये, असा शब्दछळ पोराजे यांनी चालूच ठेवला.
आदर्श ग्रामपंचायत अधिकारी - श्री. गणेश रामजी गावित (लोकसेवेचा वसा, घराण्याचे संस्कार अन् गावाचा विकास)
आपल्या गावाचा विकास करायचा असेल, तर त्याच्या मातीत मिसळून काम करणारा माणूस लागतो. शासनाच्या योजना कागदावरून थेट हक्कदार नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे खरे काम 'ग्रामपंचायत अधिकारी' करत असतो. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बाभळडरा (पो. सतचांड) गावचे सुपुत्र श्री. गणेश रामजी गावित यांनी आपल्या निष्ठेने अन् जिद्दीने 'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी' म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. लहानपणापासूनच मनात बाळगलेला नोकरीचा ध्यास, आई-वडिलांचे संस्कार अन् कामाची आवड या जोरावर त्यांनी गावाच्या विकासाचा चांगला पाया रचला आहे.
स्मार्ट कारभार आणि तरुण पोरांना मोलाचा सल्ला: ग्रामपंचायतीचा कारभार करताना, गावित यांनी संगणक पद्धतीवर भर दिला. कामात 'स्मार्ट' पणा आणला. कामात पारदर्शकता राहावी म्हणून त्यांनी ऑनलाइन कामे आणि सोशल मीडियाचा वापर केला.
आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार: खेडाव येथे ग्रामपंचायतीत १० वर्षे कामकाज केल्यानंतर त्यांची बदली सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत भवानी येथे झाली. भवानीत ५ वर्षे पूर्ण झाली असून, त्यांच्या या चांगल्या कामाची दखल घेऊन, सन २०२५ मध्ये जिल्हा परिषदेकडून त्यांना 'शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.