Nashik School Reopening Shopping | रविवार ठरला शालेय साहित्य खरेदीचा 'सुपर सन्डे

Nashik School Reopening Shopping | बाजारपेठेत पालकांची गर्दी : वह्या, पुस्तके, दप्तराच्या दरात २५ टक्के वाढ
Nashik School Reopening Shopping
Nashik School Reopening Shopping
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी (दि. १५) शाळेची पहिली घंटा वाजणार असल्याने, शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांनी रविवारी (दि. १४) बाजारपेठेत गर्दी केल्याने, रविवार हा खरेदीचा 'सुपर सन्डे' ठरला. वह्या, पुस्तके, आकर्षक वॉटर बॉटल, ट्रेंडी कंपासपेटचा, मुलांच्या आवडीचे 'छोटा भीम', 'मोटू पतलू', 'शिवा', 'स्पायडरमॅन' यांसारखी कार्टून्स व्यक्तिरेखा असलेली दप्तरे, स्मार्ट डबे खरेदीकडे पालकांचा कल दिसला.

Nashik School Reopening Shopping
Thane School: ठाण्यात १५ जूनला शाळा सुरु; विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग सुरू

यंदा या साहित्याच्या किमतीत २५ टक्के वाढ झाली असली, तरी पाल्याच्या हट्टापुढे पालकांना खिशाला झळ सोसत ट्रेंडी साहित्य खरेदी करावे लागले. जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे देशात निर्माण झालेल्या इंधन तुटवड्धाचा परिणाम शालेय साहित्यांच्या किमतींवर झाला आहे. २० ते २५ टक्क्यांनी दर महागल्याने, यंदा विद्यार्थ्यांमागे ३ ते ४ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे.

दरम्यान, रविवारी पालकांनी मेन रोड परिसरात शालेय साहित्य खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. गणवेश खरेदीसाठी पालकांच्या रांगा लागल्या होत्या. वाशिवाय शूज, दप्तर, वह्या, पुस्तके, कंपासपेटी हे साहित्य खरेदीसाठी दुकानांबाहेर पालकांची मोठी गर्दी होती.

Nashik School Reopening Shopping
Thane School: ठाण्यात १५ जूनला शाळा सुरु; विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग सुरू

सकाळपासूनच पालक आणि विद्यार्थ्यांची बाजारपेठेत लगबग दिसून आली. शालेय साहित्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगळेपण बघावयास मिळाले. मुख्य बाजारपेठेबरोबरच उपनगरांमधील बाजारपेठेतदेखील पालक आणि विद्यार्थ्यांची खरेदीसाठी लगबग दिसली. मेन रोड, शालिमार, एमजी रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरातील शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये रात्री उशिरापर्यंत पालकांची वर्दळ होती. नवीन साहित्य बघून विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

छत्री, रेनकोट खरेदीला प्राधान्य

जून महिना निम्मा संपूनदेखील पावसाची प्रतीक्षा असली, तरी पालकांनी शालेय साहित्याबरोबरच छत्री आणि रेनकोट खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. 'अल निनों मुळे यंदा पाऊस लांबला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने यंदा पाऊसदेखील कमी सांगितलेला आहे. मात्र, अशातही पालकांनी छत्री आणि रेनकोट खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

यंदा सर्वच शालेय साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. विक्रेते दर कमी करण्यास स्पष्ट शब्दांत नकार देतात. बहुतांश दुकानांमध्ये 'फिक्स रेट' अशा पाट्छा लावलेल्या आहेत. गणवेश आणि बूट खरेदीत कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट दिला जात नाही. असे असले, तरी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागणारच. यंदा बजेटनुसार साहित्य खरेदीचा विचार केला होता. मात्र, वाढलेल्या दरांमुळे अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले.

सुरेश गुजराथी, पालक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news