Shardiya Navratri 2026 | शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ; घटस्थापनेच्या साहित्याने नाशिकची बाजारपेठ फुलली

Shardiya Navratri 2026 | शक्तीची उपासना आणि भक्तीचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. ११) प्रारंभ होत असून, घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Shardiya Navratri 2026
Shardiya Navratri 2026
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शक्तीची उपासना आणि भक्तीचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. ११) प्रारंभ होत असून, घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेसाठी लागणारे मातीचे घट, पूजेसाठीची माती, धान्य, नारळ, आंब्याची पाने, फुले, हार, तोरणे आणि पूजासाहित्याचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील मेन रोड, रविवार कारंजा आणि गोदावरी घाट परिसरात विक्रेत्यांची दुकाने थाटली असून, ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.

Shardiya Navratri 2026
Dwarka Datta Mandir Road | द्वारका ते दत्तमंदिर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा; नाशिक महापालिकेची 84 कोटींची मोठी बचत

मुख्य बाजारपेठेबरोबरच सिडको, सातपूर, आडगाव, नाशिक रोड आणि मखमलाबाद या उपनगरी भागांमध्येही घटस्थापनेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. घरगुती घटस्थापना करणाऱ्या कुटुंबियांकडून पारंपरिक पूजासाहित्याला पसंती दिली जात आहे. त्याबरोबरच आवश्यक सांगातील घट, नक्षीकाम केलेले कलश, देवीच्या सजावटीसाठी वस्त्रे, कृत्रिम फुले आणि तयार पूजासाहित्याचीही मागणी आहे.

घटस्थापनेसाठी लागणाऱ्या मातीमधील मातीच्या घाटाला विशेष महत्त्व आहे. साध्या मातीच्या घटासोबतच रंगीत आणि नक्षीकाम केलेले घट बाजारात उपलब्ध आहेत. पारंपरिक तांब्या - पितळेचे कलश, पूजेसाठीची माती, नऊ धान्यांचे मिश्रण, नारळ, आंब्याची पाने, विड्याची पाने, सुपारी, हळद-कुंकू, अक्षता, मौली, कपूर आणि अगबत्ती अशा वस्तूंची खरेदी केली जात आहे.

देवीच्या पूजेसाठी लाल किंवा पिवळे वस्त्र, चुनरी, फुलांच्या माळा, झेंडूची फुले, तोरणे, रांगोळी, समई, दिवे आणि पूजेच्या थाळ्यांनाही मागणी आहे. काही विक्रेत्यांकडे सर्व आवश्यक वस्तू एकत्र असलेले तयार पूजासाहित्य उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे होत आहे.

दरम्यान, मेन रोड, रविवार कारंजा आणि गोदावरी घाट परिसरातील बाजारपेठांमध्ये एकाच ठिकाणी विविध पूजासाहित्य उपलब्ध असल्यामुळे सध्या बऱ्याचदा ग्राहकांची सोय होत आहे, सिडको, सातपूर, आडगाव, नाशिक रोड आणि मखमलाबाद या उपनगरीय बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

Shardiya Navratri 2026
Divyang School Recruitment Scam| नाशिक, धुळे अन् जळगावात दिव्यांग शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उघडकीस!

कोट्यवधींची उलाढाल:
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे पूजासाहित्य विक्रेते, फुलविक्रेते, कुंभार, नारळ विक्रेते आणि सजावटीच्या वस्तूंच्या विक्रेत्यांना व्यवसायाची संधी मिळते. शहरातील मक्याची बाजारपेठेबरोबरच उपनगरांमध्येही तात्पुरती दुकाने उभी राहिल्यामुळे या उलाढालीत अनेक लहान व्यवसायिकांचा सहभाग असतो. त्यामुळे घटस्थापनेच्या साहित्याच्या विक्रीतून शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news