Nashik M. D. drugs Seized : पाथर्डी परिसरात एम. डी. ड्रग्जसह संशयित ताब्यात

इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 Drug Seized News
Nashik M. D. drugs Seized : पाथर्डी परिसरात एम. डी. ड्रग्जसह संशयित ताब्यातpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : एम. डी. ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट-२ यांनी संयुक्त कारवाई करत पाथर्डी परिसरातून ताब्यात घेतले. शुभम राजेंद्र येवले (२५) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ५.५ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकूण २,२६,७५० किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट क- २ चे पथक पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना हवालदार मनोहर शिंदे यांना शुभम येवले हा एनडीपीएस गुन्ह्यातील फरार संशयित पाथर्डी शिवार येथील एका इमारतीत एम.डी. ड्रग्जची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. कारवाई दरम्यान शुभम येवले याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये ५.५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) किंमत २७,५००, रोख १,४९,०५०, तसेच इतर मुद्देमाल असा एकूण २,२६,७५० किमतीचा माल जप्त झाला.

 Drug Seized News
Nashik Crime : कर्ज काढून देण्याचे आमिष देत 19 लाखांचा गंडा

या प्रकरणी पोहवा मनोहर शिंदे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी सुशिला कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, विशाल पाटील, संजय सानप, भारती देवकर, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, महेश खांडबहाले, जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news