Nashik Crime : कर्ज काढून देण्याचे आमिष देत 19 लाखांचा गंडा

अंबड पोलिस ठाण्यात दोन संशयिताविरोधात एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल
Fraud Case
Nashik Crime : कर्ज काढून देण्याचे आमिष देत 19 लाखांचा गंडाfile photo
Published on
Updated on

सिडको (नाशिक) : कर्ज काढून देतो तसेच फ्लॅटची रजिस्ट्री करून देतो, असा सांगत १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोन संशयिताविरोधात एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगन्नाथ विठ्ठल वाणी (६५, रा. सावतानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित प्रसाद राऊत आणि प्रसाद वाणी हे त्यांच्या घरी येऊन आम्ही बँकेतून लोण काढून देतो असे सांगून त्यांचा विश्वास प्राप्त केला. त्यानंतर फ्लॅट दाखवून फ्लॅटची रजिस्ट्री करून देऊ असे सांगत फिर्यादीला आणखी एका अनोळखी व्यक्तीची भेट घडवून आणली. त्या व्यक्तीला हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे असे सांगत त्याच्याकडून एक लाख रुपये घेण्यास भाग पाडले. याच दरम्यान संशयितांनी फिर्यादीकडून एसबीआय बँकेचे कोरे चेक घेऊन त्यावर सह्या करून घेतल्या. परस्पर १८ लाख रुपये आरटीजीएसद्वारे सोनाराकडे पाठवून त्याच्या बदल्यात सोने खरेदी केले. अशी एकूण त्यांची १९ लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने जगन्नाथ वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news