Nashik Crime News | नाशिकरोडमध्ये प्रेमसंबंधातून वाद; तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करणारा संशयित जेरबंद

Nashik Crime News | प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे.
arrest
arrest
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. आकाश अंबादास कांगुणे (२४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला एकलहरे परिसरातून ताब्यात घेतले.

arrest
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

फिर्यादी पूनम सौदे यांचा मुलगा यश याच्याशी परिसरात राहणारी एक महिला प्रेमसंबंध ठेवण्यास इच्छुक होती. यासाठी ती त्याला वारंवार फोन करून संपर्क साधत होती. मात्र, यश याने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून ११ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश कांगुणे, आकाश कांगुणे आणि इतरांसह संबंधित महिलेने फिर्यादीच्या घरी जाऊन वाद घातला.

arrest
Kumbhamela | सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी भुसावळ रेल्वे विभागाचे 'मेगा प्लॅनिंग'; नाशिक परिसरातील पाच स्थानकांचा १,६३० कोटींचा कायापालट!

यावेळी आकाश कांगुणे याने यशला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. याप्रकरणी १२ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्ह्यातील फरार संशयित आकाश कांगुणे हा एकलहरे परिसरात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.