Nashik MLC Election | शिंदे शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता

Nashik MLC Election | विधान परिषद निवडणूक; इच्छुकांचे मुंबईत लॉबिंग सुरू
Nashik MLC Election
Nashik MLC Election file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दोन वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. महायुतीत ही जागा शिंदे शिवसेनेकडे असल्याने इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रदेश पातळीवर गाठीभेटी घेत, लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. तर, भाजपमधील काही इच्छुकांनीही थेट मुंबई गाठत या जागेसाठी दावा केला आहे.

Nashik MLC Election
Nashik ACB Raid | वृक्षतोड परवानगीसाठी लाच घेताना वनविभागाच्या सहा कर्मचाऱ्यांना अटक

मतदारसंघात पक्षाचे वर्चस्व असल्याने ही जागा भाजपला घेण्यात यावी, अशी मागणी इच्छुकांनी मुंबईत केल्याची चर्चा आहे. भाजपच्या या दाव्याने शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून, येत्या १८ जून रोजी मतदान होत आहे, तर दि. २२ जून रोजी मतमोजणी होईल. महायुतीत ही जागा शिंदे शिवसेनेच्या वाट्याला असल्याचा दावा शिंदे सेनेने केला आहे.

गत निवडणूक नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेकडून लढविली होती. आता ते शिंदे सेनेत आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे सेनेकडेच राहणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठामपणे सांगितले. तर, भाजपनेदेखील या जागेसाठी हट्ट धरला आहे. गत निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे (फुटीपूर्वीची शिवसेना) उमेदवार दराडे यांना पाठिंबा न देता, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना पाठिंबा दिला होता. मात्र सहाणेंचा पराभव झाला आता राजकीय समीकरणे बदललेली आहेत.

Nashik MLC Election
Nashik Water Scarcity | जिल्ह्यात 347 गावांना 118 टँकरने पाणीपुरवठा

शिवसेना तसेच राष्ट्रवादी फुटली असून, महायुतीत सहभागी आहे. महायुती असली, तरी काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर लढली होती. मनपा, नगर परिषदांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, अशी मागणी इच्छुकांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केल्याचे बोलले जात आहे.

भाजपचा जागेसाठी हट्ट बघता, शिंदे शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर लढण्याची शक्यता आहे. दरम्यान माजी खा. देवीदास पिंगळे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. पिंगळे कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करणार हा ट्विस्ट कायम ठेवल्याने याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत.

उच्छुकांची संख्या वाढली

शिंदे सेनेकडून माजी आ. नरेंद्र दराडे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, आ. सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांचीही नावे पुढे आली आहेत. शिवाय पक्षाकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून माजी स्थायी सभापती गणेश गिते यांसह माजी आ. बाळासाहेब सानप, नीलेश बोरा, बापूराव पिंगळे यांच्या नावांची चर्चा पक्षांतर्गत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news