

सिडको : येथील लेखानगर भागात गुरुवारी रात्रीच्या सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शास्त्राचा वापर करीत घरासमोर उभ्या असलेल्या चाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी केली. हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष परिसरात गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून रात्रीच्या सुमारास हातात धारदार शस्त्र घेत नागरिकांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या गाड्यांचे नुकसान करण्याबरोबरच काही नागरिकांना इजा करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. यातच काही अल्पवयीन गुन्हेगारांकडून देखील परिसरात हातात कोणत्या सारखे धारदार शस्त्र घेत दहशत पसरवण्याचे प्रकार घडत आहे. नुकत्याच महापालिका निवडणुका झाल्या असून निवडणुका होताच गुन्हेगारांनी डोके वर काढण्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गुरुवारी रात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेत लेखानगर नासिक एका चार चाकी वाहनांचे काचा फोडून नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे. अंबड पोलिसांना कळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी सांगितले.