Nashik Kumbh Tapovan Tree Cutting Controversy : झाडांचे पुनर्रोपण, प्रदर्शन केंद्र मात्र रद्द

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
नाशिक
प्रदर्शन केंद्रांच्या निविदेवरून भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागल्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन बॅकफूटवर आले आहेत.( छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक/ सिडको : तपोवनात साधुग्रामच्या नावावर प्रस्तावित १ हजार ८२५ वृक्षतोडीच्या निर्णयाबरोबर ३३ एकर क्षेत्रावर पीपीपी तत्वावर २२० कोटी रुपये खर्चून तयार केल्या जाणाऱ्या प्रदर्शन केंद्रांच्या निविदेवरून भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागल्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन बॅकफूटवर आले आहेत. प्रदर्शन केंद्र होणार नाही असे सांगत, या निविदेला स्थगिती देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच पर्यायी १५ हजार झाडे लावल्याशिवाय तपोवनातील झाडे तोडली जाणार नाहीत, असे नमूद करत १७०० झाडांचे पुनर्रोपण केले जाईल, असेही महाजन यांनी जाहीर केले.

तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. साधूग्रामसाठी १८२५ वृक्षतोड करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात राज्यातील पर्यावरण प्रेमींसह शिवसेना (उबाठा) प्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राशप नेते रोहित पवारांपाठोपाठ राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गट हे घटक पक्षही भाजप विरोधात गेल्याने भाजपची कोंडी झाली आहे. त्यातच महापालिकेने तपोवनातील साधुग्रामच्या जागेत २२० कोटी रुपये खर्चून पीपीपी तत्वावर प्रदर्शन केंद्र उभारण्याची निविदा काढल्याने या आंदोलनात तेल ओतले गेले असून भाजपची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यामुळे वृक्षतोड करणारच अशी भूमिका घेणारे महाजन आता बॅकफुटवर आले आहेत.

नाशिक
Tapovan Nashik tree cutting : तपोवनातील वृक्षतोडीचा वाद चिघळला

महाजन यांनी शुक्रवारी (दि.५) नाशिकमध्ये दाखल होत पर्यायी वृक्षलागवड करण्यासाठी पेलिकन पार्क परिसरातील जागेची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी प्रदर्शन केंद्राच्या २२० कोटींच्या निविदेला स्थगिती दिली. झाडे तोडून तपोवनात कोणतेही प्रदर्शन केंद्र उभारले जाणार नसल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.तसेच सदरचे केंद्र रद्द करण्यासाठी महापालिका आयुक्तांसमवेत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळा होणार नाही असे म्हणणे चुकीचे आहे. काही लोक म्हणतात साधू गांजा पितात असे म्हणून आमच्या धार्मिक भावना दुखवू नका असे आवाहनही महाजन यांनी यावेळी केले. तपोवनातील वृक्षांच्या पुन:रोपणासह नवीन लावण्यात येणाऱ्या वृक्षांची योग्य देखाभाल व निगा राखण्यात येईल. या वृक्षांमुळे हरित नाशिक- हरित कुंभमेळा संकल्पना साकार होवून आगामी काळात पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

नाशिक
Tapovan Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीचा वाद दिल्लीत पोहोचला, खासदारांनी घेतली केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट

१७०० झाडांचे पुनर्रोपण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तपोवन परिसरात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यासाठी केवळ 10 वर्षांच्या आतील 1700 वृक्षांचे पुन:रोपण शहरातील सिडको येथील पेलिकन पार्क, गंगापूर गाव येथील कानेटकर उद्यानासह उपलब्ध जागांच्या ठिकाणी केले जाणार आहे. यासह शहरात नवीन 15 हजार वृक्षांची लागवड शासन व लोकसहभागातून केली जाणार आहे. यात वड, पिंपळ, जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश असून 15 फूट वाढ झालेले हे वृक्ष हैदराबाद येथून मागविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) खर्च करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Nashik Latest News

शिवसेनेची भूमिका विक्षिप्त

महाजन यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या आंदोलनावरही टीकास्त्र डागले. राज्यात सत्तेत शिवसेना आमच्या सोबत आहे. कुंभमेळा झाला नाही तरी चालेल असे म्हणणे विक्षिप्तपणाचे असल्याची टिका महाजन यांनी शिंदेसनेवर केली. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या कामांसह तपोवनातील आंदोलनावरून कोणी राजकीय पोळी भाजू नये, असा इशाराही महाजन यांनी राजकीय पक्षांना दिला. जे कोणी आंदोलन करत आहेत ते नंतर तोंडघशी पडतील असा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news