Nashik Simhastha Kumbh Mela 2027| सिंहस्थात विद्यार्थ्यांना सेवेची पर्वणी, पर्यावरण संवर्धनासाठी शैक्षणिक संस्थांचा पुढाकार

Nashik Simhastha Kumbh Mela students environment| सिंहस्थात विद्यार्थ्यांना सेवेची पर्वणी, पर्यावरण संवर्धनासाठी शैक्षणिक संस्थांचा पुढाकार
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुंभमेळ्याचे आध्यात्म, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह नदी, जलस्रोत आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अखेरीस विद्यार्थ्यांसाठी पर्वणी आयोजित करण्याचा संकल्प जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी केला आहे. शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून २८ जुलै २०२८ पर्यंत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून 'विद्यार्थी पर्वणी' साजरी करण्याचे नियोजन आहे. पर्वणीपूर्वी दोन दिवसीय 'छात्र परिषद' ही घेण्याची घोषणा जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह राणा यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यावेळी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचे गोपाळ पाटील, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्रक, नामकोचे ज्येष्ठ संचालक वसंत गिते, उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती, अॅड. आकाश छाजेड, जलबिरादरी संस्थेचे राज्याध्यक्ष नरेंद्र चुग आदी उपस्थित होते. डॉ. सिंह म्हणाले की, कुंभमेळा ही केवळ

गावोगावी जलस्रोत स्वच्छता

विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील विहिरी, नद्या, नाले आणि अन्य जलस्रोतांची स्वच्छता करून स्थानिक पातळीवर पर्वणी स्नानाचा उपक्रम राबवावा, अशी संकल्पना आहे. धार्मिक परंपरेला जलस्रोत संवर्धनाची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्याचा यामागील उद्देश आहे.

शैक्षणिक संस्थांची बैठक

हा उपक्रम सध्या प्राथमिक टप्प्यात असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी (दि. ६) बैठक घेतली. बैठकीत उपक्रमाचे स्वरूप, संस्थांचा सहभाग, अंमलबजावणी आणि वर्षभराचे वेळापत्रक निश्चित करणार असल्याची माहिती गोपाळ पाटील यांनी दिली.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका स्वीकृत नगरसेवकपद निवडणूक; काँग्रेसने दाखल केलेला अकरावा अर्ज छाननी समितीतून अधिकृतपणे फेटाळला

धार्मिक पर्वणी नसून त्यामागे सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक एकात्मता आणि निसर्गसंवर्धनाची व्यापक परंपरा आहे. कुंभमेळ्याचा मूळ उद्देश आणि गोदावरीशी असलेले सांस्कृतिक व पर्यावरणीय नाते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवले असून चर्चासत्रे, मार्गदर्शन शिबिरे, प्रबोधनपर कार्यक्रम आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुंभमेळ्याचे महत्त्व, गोदावरी नदीचे संवर्धन, जलसाक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांना नदी, पाणी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे ही भविष्याची पिढी घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम दिसतील.

- जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह राणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.