Nashik Kumbh Mela 2026 | कुंभमेळ्यास येणाऱ्यांना रेल्वे देणार कलर कोडिंगचे तिकीट

Nashik Kumbh Mela 2026 | गर्दीची विभागणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची उपाययोजना
Railway Ticket rules
Railway Ticket rules |pudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये कुंभमेळा काळात रेल्वेच्या तिकिटामागे वेगवेगळ्या कलरचे कोडिंग केले जाणार आहेत. रंगानुसार होल्डिंग एरिया, प्लॅटफॉर्म तिकीट, विशिष्ट परिसराचा अथवा स्टेशनचा थांबा दर्शवण्यासाठी विविध कलरचे कोडिंग केले जाणार आहे. गर्दीची विभागणी, संभाव्य निर्माण होणारे अपघात आणि प्रवाशांना मार्गदर्शक म्हणून या कलर कोडिंगचा वापर होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Railway Ticket rules
Godavari River Pollution Case | औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उपसमितीकडून पाहणी

भुसावळ विभागात असणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्प, नाशिकरोड, ओढा, खेरवाडी, निफाड या पाच स्थानकांवर रेल्वे सध्या होल्डिंग एरिया वाढवत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतून येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून त्या ठिकाणांवरून प्रवाशांना कुंभमेळ्याच्या स्थानापर्यंत आणले जाणार आहेत.

यासाठी तिकिटांवर वेगवेगळ्या रंगांचे स्टिकर किंवा कलर कोडिंग वापरले जाणार आहेत. प्रयागराजला विविध रंगांचे स्टिकर आणि कलर कोडिंग वेगवेगळ्या स्थानांनुसार वापरण्यात आले होते. उदाहरणच द्यायचे झाले तर होल्डिंग एरियाला एका विशिष्ट रंगाचे व प्लॅटफॉर्मवर वावर करण्यासाठी एक विशिष्ट रंगाचे स्टिकर तिकिटावर असणार आहे.

Railway Ticket rules
Ashok Kharat Case | नाशिकच्या 'भोंदू' बाबाच्या भक्तीत आमदार पत्नीही? अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

प्लॅटफॉर्म ट्रेनची दिशा संबंधित लाल, निळा, हिरवा, पिवळा अशा कलरचे स्टिकर तिकिटामागे अथवा फ्रंटला लावले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनकडून यासंबंधी संशोधन आणि विकासाला चालना दिली जात आहे. यासंबंधीचा आराखडा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

यातून रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांना तिकिटावरील कलरनुसार मार्गदर्शन करणे सोपे होणार आहे. विशिष्ट रेल्वेस्थानकाला विशिष्ट रंग तिकिटावर असल्याने प्रवाशांचाही गोंधळ होणार नाही. प्रचंड गर्दीत गोंधळ टळू शकतो. प्रवाशांना योग्य प्लॅटफॉर्मकडे पटकन पोहोचता येऊ शकते.

आम्ही प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या स्थानकांवर विविध रंगांचे तिकीट ठेवण्यासाठी कृती आराखडा आखत आहोत. यासंबंधी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत प्रवाशांना मार्गदर्शन केले जाईल. विविध रंगांची तिकिटे अथवा स्टिकर असल्यास गर्दीची वर्गवारी करणे सोपे होणार आहे.

- भानुदास तपस्वी, डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news