Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण तयारीसाठी 20 ऑक्टोबरचा अल्टिमेटम; प्रशासकीय यंत्रणेची बैठक संपन्न

Simhastha Kumbh Mela | सुरक्षा, वाहतूक, वाहनतळासह गोदावरी आरतीचे सूक्ष्म नियोजन
Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती आणि विविध शासकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. सुरक्षा, वाहतूक, वाहनतळ, पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसह सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करून ते २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याविषयी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Simhastha Kumbh Mela
Sambhajinagar Accident | नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानासह तरूण जागीच ठार

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबरला होत असून, त्यापूर्वीच्या विविध कार्यक्रमांच्या तयारीला प्रशासनाने वेग दिला आहे. या संदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात दंडाराडा झालेल्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांच्यासह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,

पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सा. बां. विभाग मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेश गोवर्धने, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपायुक्त नियोजन योगेंद्र चौधरी, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर आदी उपस्थित होते.

बैठकीत ध्वजारोहण सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने सुरक्षाव्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देताना पोलिस विभागाने बंदोबस्त, गर्दी नियंत्रण, बॅरिकेडिंग आणि सुरक्षा पासची व्यवस्था करावी. व्हीव्हीआयपी मार्ग, वाहनांची ये-जा आणि वाहनतळ निश्चित करताना संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा.

तसेच कार्यस्थलियांरांची क्षेत्रीय पाहणी करून आवश्यक जागा निश्चित करण्याच्या सूचनाही आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यासपीठ, हेलिपॅड, बॅरिकेडिंग आणि अन्य पायाभूत सुविधांची तयारी वेळेत पूर्ण करावी. विद्युत व्यवस्था, मंदिर परिसरातील रोषणाई, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य पथकांच्या नियुक्त्यांवर भर द्यावा. विश्रामगृहामधील व्यवस्थेसह भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. दरम्यान, पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे यांनी सुरक्षाव्यवस्थेबाबत सूचना केल्या.

Simhastha Kumbh Mela
Devidas Pingle Nashik | नाशिक बाजार समिती इतिवृत्त प्रकरणात माजी सभापती देवीदास पिंगळे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्ताचे नियोजन स्पष्ट केले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामतीर्थ परिसरातील स्वच्छता व गोदावरी आरतीच्या तयारीची माहिती दिली, तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागांना राजशिष्टाचारा आणि कायदा सुव्यवस्थेविषयी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.

शंखनादापासून ग्रामपरिक्रमेपर्यंत कार्यक्रम:

सिंहस्थाच्या पूर्वतयारींतर्गत १७ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर येथे ग्रामसभा, २० ऑक्टोबरला 'हर घर कुंभध्वज' उपक्रम, २५ ऑक्टोबरला 'शंखनाद' कार्यक्रम, ३० ऑक्टोबरला ग्रामपरिक्रमा आणि संयुक्त पाहणी आयोजित आहे. या कार्यक्रमांसाठी गर्दी नियंत्रण, वाहतूक आणि वाहनतळ व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यासह धार्मिक संस्था व सर्व आखाड्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news