Nashik Trimbakeshwar Kumbh Mela |प्लास्टिकमुक्त कुंभासाठी व्यापक आराखडा; 'आयसीटी' आधारित प्रणालीद्वारे देखरेख

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela |सुमारे आठ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी २४ तास नियुक्त करणार
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्लास्टिकमुक्त कुंभासाठी व्यापक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार कुंभक्षेत्रात पूर्णपणे प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, तसेच स्वच्छता साफसफाईच्या कामासाठी सुमारे आठ हजारांहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती करण्यात येणार व आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Karul Ghat Vaibhavwadi Road | करूळ घाट मार्ग सुसाट; मात्र दरडी कोसळण्याचा धोका कायम

घाट आणि प्रमुख ठिकाणी सुमारे ७ हजार कचरापेट्या ठेवण्यात येणार असून, त्यासाठी नऊ लाखांहून अधिक लाइनर बॅगचा वापर केला जाणार आहे. या बॅग दिवसातून तीन वेळा बदलल्या जाणार आहेत. संपूर्ण कुंभक्षेत्रात झाडलोट, घाटांची स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची देखभाल करण्यासाठी ८ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी तैनात राहतील. या कामांवर माहिती व संपर्क तंत्रज्ञान (आयसीटी) आधारित प्रणालीद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय यात्रेकरूंसाठी घाटांवर सुमारे २ हजार वस्त्रपरिवर्तन कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी शंभरहून अधिक अतिरिक्त कचरा वाहने, टिपर आणि कॉम्पॅक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे उभारली जाणार असून, घाटांवर कचरा साचू नये यासाठी तातडीच्या प्रतिसादासाठी विशेष पथकेही कार्यरत राहतील.

सिंहस्थ प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अन्नछत्रे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये पत्रावळ, द्रोण, कुल्हड यांसारख्या जैवविघटनशील पर्यायांचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे. तसेच रिव्हर्स व्हेंडिंग मशीन, बॅग व्हेंडिंग मशीन आणि कापडी पिशव्यांचे वितरणही करण्यात येणार आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी निर्माल्य, फुले आणि तरंगता कचरा हटविण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारली जाणार आहे.

यासाठी रिव्हर स्किमर्स, स्वच्छता नौका, फ्लोटिंग बॅरियर्स आणि हँड नेट्सचा वापर करण्यात येणार असून, घाटांवर स्वतंत्र मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. प्राधिकरणाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते जुलै २०२८ या कालावधीत व्यापक स्वच्छता जनजागृती अभियानही राबविण्यात येत आहे. स्वच्छतेची शपथ, सायक्लोथॉन, प्लॉगथॉन, मानवी साखळी, घराघरांत जनजागृती, निर्माल्य संकलन, नदी जनजागृती फेरी आणि 'क्लीन घाट' उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या उपक्रमांना नागरिक आणि विविध घटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्राधिकरणाने सांगितले.

Simhastha Kumbh Mela Nashik
Bhayandar Ghodbunder Road Project: गायमुख ते भाईंदर प्रवास होणार सुपरफास्ट

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनांपैकी एक असून, त्याची स्वच्छता ही सार्वजनिक आरोग्याबरोबरच श्रद्धेचाही विषय आहे. कुंभक्षेत्रात उच्च दर्जाची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा आणि व्यवस्थापन उभारले जात असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी

कुंभमेळ्यादरम्यान साधुग्राम, घाट परिसर, पार्किंग, होल्डिंग एरिया, प्रमुख रस्ते तसेच महामार्गालगत तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे. यात्रेकरूंना स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news