Nashik Kumbh Mela 2027: "प्रयागराज अन् उज्जैनच्या अनुभवातून नाशिकमध्ये नियोजनाची आखणी!"; आयुक्त शेखर सिंह यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक

Nashik Kumbh Mela 2027: कुंभमेळा प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा संयुक्त कृती आराखडा
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरक्षित, सुयोग्य आणि आपत्ती जोखमींच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याबरोबरच विविध विभागांमधील समन्वय वाढविण्यासाठी दोन्ही संस्थांनी पुढील कृती आराखड्यावर सहमती दर्शविली आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्हा परिषद ॲक्शन मोडमध्ये; सीईओ ओमकार पवार यांचे महत्त्वाचे निर्देश

या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि. ३) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्यालयाला भेट देऊन प्राधिकरणाचे सदस्य व विभागप्रमुख डॉ. कृष्णा एस. वत्स तसेच सल्लागार (ऑपरेशन्स, कम्युनिकेशन आणि मिटिगेशन) कर्नल कीर्ती प्रताप सिंह यांच्याशी चर्चा केली.

बैठकीत सिंहस्थ २०२७ साठीच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेण्यात आला. रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गीय, अण्वस्त्र आणि स्फोटक (सीबीआरएनई) स्वरूपाच्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठीची तयारी, धोकादायक रसायनांवरील (हॅझमॅट) विशेष प्रतिसाद वाहने उपलब्ध करून देणे तसेच विविध आपत्कालीन कार्यान्वयन केंद्रांना (ईओसी) जोडणारे एकात्मिक कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर उभारण्याबाबत चर्चा झाली. यावेळी प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार येथील कुंभमेळ्यांच्या अनुभवांचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम कार्यपद्धती सिंहस्थ २०२७च्या नियोजनात समाविष्ट करण्याबाबतही चर्चा झाली. त्यासाठी संबंधित राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांशी अधिक प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Simhastha Kumbhmela | भूसंपादनाला गती द्या, कामे वेळेत पूर्ण करा

डॉ. वत्स यांनी सिंहस्थ २०२७ च्या आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. मोठ्या धार्मिक मेळाव्यांसाठी आदर्श ठरेल असे आपत्ती जोखीम व्यवस्थापनाचे मॉडेल विकसित करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कर्नल कीर्ती प्रताप सिंह यांनी यापूर्वीच्या कुंभमेळ्यांतील, विशेषतः प्रयागराजसह अन्य ठिकाणच्या अनुभवांचे दस्तावेजीकरण करून त्या आधारे जोखिमाधारित नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. दरम्यान पुढील टप्प्यात १५ जुलैनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी नाशिकला भेट देणार असून, विविध विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

दोनदिवसीय 'अनुभव आदान-प्रदान परिषद'

क्षेत्रीय पाहणी आणि समन्वय बैठका या दौऱ्यात होणार आहेत. तसेच, सप्टेंबरच्या प्रारंभी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून दोनदिवसीय 'अनुभव आदान-प्रदान परिषद' आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये पूर्वीच्या कुंभमेळ्यांचे आयोजन केलेल्या शहरांतील अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून सिंहस्थ २०२७ साठी संस्थात्मक समन्वय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news