Nashik Explosives Seized | कसबे वणीत स्फोटक पदार्थांचा अवैध साठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पत्र्याच्या शेडवर पोलिसांचा छापा; ७ हजारांचा स्फोटक साठा हस्तगत, एकाला अटक
Nashik llegal Explosives Seized
Nashik llegal Explosives Seized pudhari
Published on: 
Updated on: 

Nashik llegal Explosives Seized

कसबे वणी : येथील जगदंबानगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले स्फोटक पदार्थ वणी पोलिसांनी छापा टाकून जप्त केले. या कारवाईत जिलेटीनच्या २०० कांड्या, डिटोनेटर बॅटरी आणि स्फोटक वायर असा एकूण सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबे वणी येथील जगदंबानगर भागात दीपक संजय सुरासे (वय ३२) याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटक पदार्थांचा अवैध साठा असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस हवालदार मुज्जम्मील देशमुख, कुणाल मराठे आणि आंबादास जाडर यांच्या पथकासह २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.

Nashik llegal Explosives Seized
Nashik Crime | सातपूरमधील मारहाण प्रकरणाचा तपास वेगात; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या छाप्यात पोलिसांना तीन हजार रुपये किमतीच्या २०० पांढऱ्या जिलेटीन कांड्या, तीन हजार ५०० रुपये किमतीची लाल रंगाची 'DEF Corex' वायर आणि ५०० रुपये किमतीची लाकडी खोक्यात ठेवलेली डिटोनेटर बॅटरी आढळून आली. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

तपासादरम्यान, दीपक सुरासे याच्याकडे स्फोटक पदार्थ हाताळण्याचे आवश्यक प्रमाणपत्र किंवा अधिकृत शासकीय परवाना नसल्याचे समोर आले. तसेच, ओझरमिग (ता. निफाड) येथील संदिप अक्कर याने कोणताही अधिकृत परवाना नसताना दीपक सुरासे याला हे स्फोटक पदार्थ पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांनी संगनमताने आर्थिक फायद्यासाठी हा स्फोटक साठा बाळगल्याचा आरोप आहे.

Nashik llegal Explosives Seized
Bosch Company Nashik | नाशिकच्या बॉश कंपनीतील 235 कामगारांना मोठा दिलासा; प्रत्येकाला मिळणार 25 लाख!

याप्रकरणी पोलीस हवालदार मुज्जम्मील देशमुख यांच्या फिर्यादीवरून रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी दीपक संजय सुरासे (रा. जगदंबानगर, कसबे वणी, ता. दिंडोरी) आणि संदिप अक्कर (रा. ओझरमिग, ता. निफाड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दीपक सुरासे याला अटक केली असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.