Bosch Company Nashik | नाशिकच्या बॉश कंपनीतील 235 कामगारांना मोठा दिलासा; प्रत्येकाला मिळणार 25 लाख!

Bosch Company Nashik | सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश लिमिटेड कंपनीने बेकायदा कामावरून कमी केलेल्या २३५ कामगारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.
Madras High Court
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश लिमिटेड कंपनीने बेकायदा कामावरून कमी केलेल्या २३५ कामगारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. प्रत्येक कामगाराला २५ लाख रुपये देऊन सेवेतून सन्मानपूर्वक निवृत्त करावे, असा आदेश न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे कंपनीवर सुमारे ६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

Madras High Court
NMC Recruitment | नाशिक महापालिकेत 212 पदांची मेगा भरती; 9 डिसेंबर अर्जाची शेवटची तारीख

बॉश लिमिटेड कंपनीच्या सातपूर येथील कारखान्यात हे कामगार सुमारे १० वर्षांपासून 'न्यू एंट्रंट टेम्पररी वर्कर' (एनईटीडब्ल्यू) म्हणून कार्यरत होते. वाहनांचे सुटे भाग उत्पादित करणाऱ्या या कंपनीत पूर्वी मारुती सुझुकी आणि फोर्ड इंडिया यांच्या डिझेल वाहनांसाठी सुटे भाग तयार केले जात होते.

मात्र, प्रदूषणविषयक कडक निकषांमुळे डिझेल वाहनांचे उत्पादन बंद झाल्यानंतर कारखान्यातील काम कमी झाले. त्यानंतर कंपनीने 'रेड लाइट अॅक्टिव्हेशन' योजना आणून कामगारांना कामाविना घरी बसविण्यास सुरुवात केली. या निर्णयाविरोधात कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालय आणि उच्च न्यायालयात कायदेशीर लढा दिला. त्यात कामगार संघटनेला विजय मिळाला.

Madras High Court
Nashik Property Tax | नाशिक महापालिकेला कर्मचारी टंचाईचा फटका; मालमत्ता कराच्या मागणीत 15 कोटींची घट

कंपनीने दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी एकाच दिवशी सुमारे ५०० कामगारांच्या महाराष्ट्राबाहेर बदलीचे आदेश काढले होते. त्यापैकी २३५ कामगारांच्या युनियनने या निर्णयाला औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने कंपनीची ही कृती बेकायदा ठरवत संबंधित कामगारांना पुन्हा नाशिक कारखान्यात रुजू करण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयात अपील

या आदेशाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला. तथापि, कामगारांना पुन्हा नाशिक कारखान्यात कामावर घेण्याऐवजी प्रत्येक कामगाराला २५ लाख रुपये देऊन कायमस्वरूपी मुक्त करण्याचा सुधारित आदेश दिला.

त्यामुळे २३५ कामगारांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे बेकायदा कामगार कपातीविरोधातील लढ्याला मोठे यश मिळाले असून, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.