Nashik Indiranagar Tunnel : इंदिरानगर बोगद्याचे रुंदीकरण होणार सुरू

वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गाची अधिसूचना जारी
Nashik Indiranagar Tunnel : इंदिरानगर बोगद्याचे रुंदीकरण होणार सुरू
Published on
Updated on

नाशिक : सोळा महिन्यांच्या प्रदीर्घ विलंबानंतर इंदिरानगर बोगदा रुंदीकरणाचे काम अखेर सुरू होणार आहे. या संदर्भात वाहतूक शहर वाहतूक शाखेतर्फे काम सुरू असल्याच्या कालावधीमध्ये पर्यायी वाहतूक मार्गांचे नियोजन पोलिस उपायुक्त किरीथीका सी. एम. यांनी जाहीर केले आहे. सदर वाहतूक मार्गातील बदल हे किमान ९ महिन्यांसाठी असणार आहेत. काम सुरू असल्याच्या कालावधीत इंदिरानगर बोगद्यातून येणारी व जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

‘एनएचएआय’च्या माध्यमातून हे रुंदीकरण होणार आहे. या दरम्यान या मार्गावरील वाहतुकीची तीव्रता बघता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच या ठिकाणावरील काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदार यांना वाहतुकीचे दृष्टीने पुढील निर्देशांचे पालन करण्याचे अटी व शर्तीवर ना- हरकत देण्यात आली आहे यामध्ये इंदिरानगर बोगदा येथील गोविंदनगर व इंदिरानगर बाजुकडील सर्व्हिसरोडवर उड्‌डाणपुलाचे कामकाजकरीता दोन्ही बाजुस वाहतुकिचे नियोजनाकरीता बेरिकेटींग करणे आवश्यक आहे. तसेच त्याठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी दिवसा व विशेष करून रात्रीच्यावेळी वाहन चालकांना दिसेल असे रेडीअमचे प्रवेश बंद, काम चालू आहे, डायव्हर्जन मार्ग, ॲरो, सावकाश जा, एकेरी मार्ग, नो पार्किंग असे बोर्ड, दिशादर्शक, सुचना फलक लावणे आवश्यक आहे.

Nashik Indiranagar Tunnel : इंदिरानगर बोगद्याचे रुंदीकरण होणार सुरू
Pudhari Special Ground Report | मनस्तापाचा 'बोगदा'

बंद राहणारे मार्ग असे

  • साईनाथनगर सिग्नलकडून - गोविंदनगर- सिटी सेंटर मॉल

  • मुंबईनाका बाजुकडील सर्व्हिसरोडने भुजबळ फार्म, लेखानगर

  • इंदिरानगर बाजुकडील सर्व्हिसरोडने लेखाागरकडुन मुंबईनाकाया मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे

असे असतील पर्यायी मार्ग :

  • साईनाथनगर सिग्नलकडुन इंदिरानगर बोगदयाकडे येणारी वाहतुक ही इंदिरानगर बोगदा येथुन डावीकडे वळुन सर्व्हिस रोडने लेखानगर मार्गे

  • सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर कडुन इंदिरानगर बोगदयाकडे जाणारी वाहतुक ही मनोहर गार्डन, इंदिरानगर बोगदा येथे डावीकडे वळुन उड्‌डाणपुल पोल क. १७० येथुन युटर्न घेवुन इतरत्र जातील.

  • सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर कडुन इंदिरानगर बोग‌द्याकडे जाणारी वाहतुक ही मनोहर गार्डन, इंदिरानगर बोगदा येथे डावीकडे वळुन प्रकाश पेट्रोलपंप, मुंबईनाका सर्कल मार्गे इतरत्र जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news