Nashik Murder Suicide Case | प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराचीही आत्महत्या

Nashik Murder Suicide Case | एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; काही तासांतच संशयित प्रियकराचीही जोगिंग ट्रॅकजवळ गळफास घेऊन आत्महत्या
Death
DeathPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर परिसरात एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करत फरार झालेल्या संशयित आरोपीने काही तासांतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली.

Death
Nashik Crime News : नाशिक हादरले! पीजीत राहणाऱ्या तरुणीचा भररस्त्यात खून; काही तासांतच संशयित आरोपीनेही जीवन संपवले!

वैष्णवी अनिल आवारे (२०) हिची हत्या केल्यानंतर फरार झालेला साहिल अशोक लावारे (२६, रा. खडकपुरा, जि. यवतमाळ) याचा मृतदेह हत्या स्थळापासून काही अंतरावरील जॉगिंग ट्रॅकजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

एकाच रात्रीत घडलेल्या हत्या आणि आत्महत्येच्या घटनांमुळे इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. १७) रात्री रथचक्र चौकाजवळील वनसंपदा सोसायटीच्या प्रवेशद्वाराबाहेर वैष्णवी आवारेवर साहिल लावारे याने एकतर्फी प्रेमातून चाकूने हल्ला केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Death
Nagpur Crime: 'चिप्स'च्या पाकीटाने खूनाच्या तपासाला कलाटणी! नागपुरात वृद्धेवर अत्याचार करून हत्या करणा-या नराधमाला 5 दिवसांत अटक

हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेला. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला.

वैष्णवीच्या मोबाईलमधील माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तपास सुरू असतानाच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ झाडाला तरुणाने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तो मृतदेह साहिल लावारे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गोपाल बैरागी (२८) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news