Nashik Crime News : नाशिक हादरले! पीजीत राहणाऱ्या तरुणीचा भररस्त्यात खून; काही तासांतच संशयित आरोपीनेही जीवन संपवले!

थरारक घटनेमुळे इंदिरानगर परिसरात प्रचंड खळबळ
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २० वर्षीय तरुणीची भररस्त्यात धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपी असलेल्या तरुणाचाही जॉगिंग ट्रॅकजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

भररस्त्यात तरुणीचा निर्घृण खून

नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ रात्री 10:30 वाजेच्या वैष्णवी आवारे (वय २०) तरुणीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. वैष्णवी वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. या प्रकरणातील संशयित आरोपी साहिल अशोक लाव्हारे हा पसार झाला होता.

Crime News
Nagpur Crime: 'चिप्स'च्या पाकीटाने खूनाच्या तपासाला कलाटणी! नागपुरात वृद्धेवर अत्याचार करून हत्या करणा-या नराधमाला 5 दिवसांत अटक

काही तासांतच संशयित आरोपीचा मृतदेह सापडला

तरुणीच्या हत्येनंतर इंदिरानगर पोलीस रात्रीपासूनच संशयित आरोपी साहिल लाव्हारे याचा शोध घेत होते. पोलीस तपास सुरू असतानाच, मध्यरात्री सुमारे २ ते ३ वाजेच्या दरम्यान इंदिरानगर परिसरातील अशोका हॉस्पिटलसमोरील जॉगिंग ट्रॅकलगत एका झाडाला साहिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खून करून पसार झालेल्या संशयिताचा काही तासांतच मृतदेह सापडल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Crime News
Nagpur Crime: 10 रुपयांच्या चहासाठी जीव घेतला! नागपुरात चहाच्या बिलावरून संतापलेल्या दुकानदाराने ग्राहकाचा गळा चिरला

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

पोलिसांचा प्राथमिक तपासानुसार, हा संपूर्ण प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, असा संशय आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून आधी तरुणीचा जीव घेण्यात आला आणि त्यानंतर आरोपीने स्वतःचे आयुष्य संपवले असावे, या दिशेने सध्या पोलीस तपास करत आहेत.

Crime News
Dharwad Doctor Murder Case : धक्कादायक! धारवाडमध्ये डॉक्टर पतीची हत्या, ८ वर्षांचा मुलगा जखमी; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. एकतर्फी प्रेम, नेमका घटनाक्रम आणि हत्येचे मूळ कारण काय होते? याचा सखोल तपास इंदिरानगर पोलिसांकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news