

सिडको (नाशिक): सिडको येथील मिळकती फ्रि होल्ड करण्यासाठी यापूर्वी काढलेल्या अध्यादेशातील त्रुटी दूर करून तातडीने सुधारित अध्यादेश काढावा यासाठी आ.सिमा हिरेंनी राज्याच्या नगरविकास विभागाचे सेक्रेटरी आसिम गुप्ता यांची भेट घेतली.
शासनाने फ्री होल्ड करण्याची घोषणा करून अनेक महिने झाले तरी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सुधारित अध्यादेशा संदर्भातील फाईल लवकरात लवकर मंत्री महोदयांकडे पाठवावी अशी विनंती वजा सूचना आ. हिरेंनी गुप्ता यांना निवेदनाव्दारे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतांना सिडकोतील मिळकती फ्रि होल्ड करण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानंतर शासनाने तसा जीआरही काढला होता.पंरतू जीआरमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने मिळकती फ्री होल्ड करण्यासाठी प्रत्यक्षात कार्यवाही होवू शकली नाही. सध्या मंत्रालय स्तरावर नव्याने सुधारित आणि परिपूर्ण जीआर काढण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे.सदर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर होत असल्याने आ.हिरेंनी नगरविकास विभागाने सेक्रेटरी आसिम गुप्ता यांनी भेट घेतली. नागरिकांना दिलासा मिळण्याकामी मिळकती फ्रि होल्ड करण्यासंदर्भात सुधारित जीआरमध्ये सहज, सोपे आणि व्यवहार्य नियम असावेत असे स्पष्ट करत प्रशासनाने तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत सुधारित अध्यादेशा संदर्भातील फाईल मंत्री महोदयांकडे तातडीने पाठवावी अशी विनंती वजा सूचना आमदार हिरेंनी गुप्ता यांना निवेदव्दारे केली आहे.