

इगतपुरी (नाशिक) : वाल्मिक गवांदे
इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत अटीतटीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या शालिनी खातळे 10,151 इतकी मते मिळवून विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी उमेदवार मधुालती मेंद्रे यांना 4,281 इतकी मते मिळाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. खातळे यांनी मेंद्रे यांचा 5870 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीचे 18 नगरसेवक विजयी, तर भाजपचे 2 व मशालचा 1 उमेदवार विजयी झाले.
गेली 30 वर्ष नगरपरिषदेवर सत्ता अबाधित ठेवणार्या माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा व त्यांनी उभा केलेल्या पॅनलचा दारुण पराभव झाला. इंदुलकर यांनी 30 वर्षांपासून शिवसेनेचा (उबाठा गट) नगरपरिषदेवर झेंडा रोवला होता.मात्र ऐन वेळी इंदुलकर यांनी भाजपात प्रवेश करून निवडणुक लढवल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे बोलले जात आहे. इंदुलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश शिरोळे यांनी दारुण पराभव केला. तर 30 वर्षापासून संजय इंदुलकर यांना टक्कर देणारे माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण दणदणीत विजयी झाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) 13, शिवसेनेचे (शिंदे गट) 5, भाजपाचे 2 तर शिवसेना (उबाठा गट) 1 उमेदवार निवडून आले. जिल्ह्यात 2 डिसेंबर रोजी 11 नगरपरिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. प्रतीक्षेत असलेली मतमोजणी रविवारी (दि. 21) रोजी झाली.
इगतपुरीत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या शालिनी खातळे यांना 10,151, काँग्रेसच्या शुभांगी दळवी 1040, वंचित बहुजन आघाडीच्या अपर्णा धात्रक यांना 1590, भाजपाच्या मधुालती मेंद्रे यांना 4281 मते मिळाली. तर 21 नगरसेवक पदासाठी 70 उमेदवारांध्ये चुरस रंगली होती. नगराध्यक्षपदी शालीनी खातळे यांना 10,151 मते मिळाल्याने विजयी झाल्या असून, इगतपुरी शहरात माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा बालेकिल्ला ढासळला आहे. एकही उमेदवार निवडून न आल्याने काँग्रेसचा सुपडा साफ झाला. ही निवडणूक अतिशय चुरसपूर्ण झाल