Nashik Sinner Election News : सिन्नरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा
सिन्नर (नाशिक) : संदीप भोर
सिन्नर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक यश मिळवत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला.
थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीत विठ्ठल उगले यांनी ठाकरे गटाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचा 5 हजार 602 मतांनी पराभव केला. उगले यांना 14 हजार 904 मते मिळाली, तर प्रमोद चोथवे यांना 9 हजार 302 मते मिळाली. शिंदेसेनेचे नामदेव लोंढे यांना 7 हजार 262 मते मिळाली तर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेंत वाजे यांना 4 हजार 859 मते मिळवून चौथ्या स्थानी राहीले. अपक्ष उमेदवार किशोर देशमुख यांना केवळ 276 मते मिळाली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित कदम यांनी माहिती दिली. सकाळी 10 वा.तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 2.45 पर्यंत निकाल हाती आले.
खासदार वाजेंना मोठा धक्का
ठाकरे गटाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांच्या पराभवामुळे निवडणुकीत ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे व खासदार राजाभाऊ वाजे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. चोथवे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: प्रकाशभाऊ वाजे हजर होते. तसेच प्रचार सभेतून त्यांनी ‘पिटू चोथवे हे माझ्या घरातील उमेदवार आहे’, असे सांगत त्यांच्या विजयासाठी आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला मतदारांनी झुगारल्याचे दिसून आले.
पक्षीय बलाबल असे....
एकूण जागा - 30
शिवसेना (उबाठा) - 14 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार
गट) - 13 जागा
भाजप - 2 जागा
शिंदेसेना - 1 जागा
नगराध्यक्ष उगले यांची ‘फिनिक्स भरारी’
विठ्ठल उगले हे सिन्नरचे चौथे लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी स्व. रामनाथ काका चांडक, स्व. जगूशेठ चांडक, त्यानंतर खासदार वाजे यांच्या नेतृत्वात किरण डगळे यांच्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयाचा गुलाल उगले यांच्या भाळी लागला आहे. तशी त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षमय ठरली आहे. यापूर्वी आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वात त्यांनी नगराध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. तरीदेखील 2016 च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना सध्याचे त्यांचे सहकारी बाळू उगले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी बाळू उगले वाजे यांच्या गोटात होते. विठ्ठल उगले यांनी आमदार कोकाटे यांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करीत यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवत विजयाची ‘फिनिक्स भरारी’ घेतली आहे.
ठाकरे गटाच्या लक्ष्मी पवार यांना चिठ्ठीचा कौल
प्रभाग क्रमांक 6 मध्ये चिठ्ठी पद्धतीने निकाल लागला असून, या प्रभागातून उबाठाच्या लक्ष्मी राजू पवार विजयी झाल्या आहेत. येथे लक्ष्मी पवार व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दीपाली बेंडकुळे यांना 978 अशी समसमान मते मिळाली. अवनी अमोल हारक या चिमुकलीच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात नशिबाने लक्ष्मी पवार यांना साथ दिली. पवार यांना प्रभागातून विजयी घोषित करण्यात आले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा ‘फेल’;
सिन्नर नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेमंत वाजे यांच्यासह भाजप उमेदवारांसाठी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामदेव लोंढे यांच्यासह शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र या दोहोंना मतदारांनी अपेक्षित कौल दिलेला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीतदेखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाच कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. तेव्हाही अपेक्षित यश मिळाले नव्हते. यावेळी तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार वाजे थेट चौथ्या स्थानी फेकले गेले. तथापि, युवा नेते उदय सांगळे यांच्यासह हेमंत वाजे यांनी शहर पिंजून काढले होते.
प्रभाग 14 मध्ये मोरे दाम्पत्याची सरशी
सिन्नर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या पंकज मोरे व ज्योती मोरे या दाम्पत्याची सरशी झाली आहे. नगर परिषदेच्या इतिहासात माजी नगराध्यक्ष हरिभाऊ लोंढे-भामाताई लोंढे, त्यांचे पुतणे नामदेव लोंढे-चित्रा लोंढे यांच्यानंतर मोरे दाम्पत्य सभागृहात जाणारे तिसरे दाम्पत्य ठरले आहे. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन देशमुख व शीतल विसे यांचा पराभव केला.
प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते असे...
प्रभाग क्र. 1अ सविता खोळंबे- (सेना उबाठा) 1096 विजयी
पूजा खर्डे (शिवसेना) 333
वंदना गोजरे (राष्ट्रवादी काँग्रेस) 1095
प्रभाग क्र. 1 ब) बाळू उगले (राष्ट्रवादी) 1617 विजयी
गणेश खर्जे (शिवसेना) 262
गणेश लोंढे (भाजपा) 134
संतोष शिंदे (शिवसेना उबाठा) 783
प्रभाग क्र. 2 अ) सविता कानडी (सेना उबाठा) 1174 विजयी
शीतल कानडी (राष्ट्रवादी काँग्रेस) 1104
प्रभाग क्र. 2 ब) पंकज जाधव (राष्ट्रवादी) 1043 विजयी
चंद्रकांत गवळी (भाजपा) 421
राजेंद्र घोरपडे (शिवसेना उबाठा) 771
प्रभाग क्र. 3 अ) कांताबाई जाधव(राष्ट्रवादी )1031 विजयी
शोभा जाधव (शिवसेना उबाठा) 900
मनिषा भालेराव (भाजपा) 206
प्रभाग क्र. 3 ब) आशिष गोळेसर (राष्ट्रवादी )1210 विजयी
नितीन कराळे (शिवसेना उबाठा) 617
गणेश परदेशी (भाजपा) 261
हरिभाऊ तांबे (भाकप) 51
प्रभाग क्र. 4 अ) शोभा जाधव (शिवसेना) 990 विजयी
आशा जाधव (शिवसेना उबाठा) 280
संध्या जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) 790
प्रभाग क्र. 4 ब) सागर भाटजिरे(राष्ट्रवादी)1079 विजयी
संदीप लोंढे (शिवसेना उबाठा) 52
हर्षद गोळेसर (भाजपा) 134
शुभम लोंढे (शिवसेना) 797
देवानंद जाधव (अपक्ष) 253
प्रभाग क्र. 5 अ) उदय गोळेसर (शिवसेना उबाठा) बिनविरोध
प्रभाग क्र. 5 ब) मनिषा गवळी (राष्ट्रवादी) 1350 विजयी
तहरीन खतीब (काँग्रेस) 1159
असुदीप भाटजिरे (भाजपा) 321
अर्चना नळवाडे (शिवसेना) 364
प्रभाग क्र. 6 अ) चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. यामध्ये लक्ष्मी पवार (सेना उबाठा) 978 विजयी
दिपाली बेंडकुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) 978
विद्या मोरे (भाजप) 497
प्रभाग क्र. 6 ब) मनोज देशमुख (सेना उबाठा)803 विजयी
सविता कोठूरकर (भाजप) 324
संदीप कोळथे (शिवसेना) 219
मेहमूद दारुवाले (अपक्ष) 663
सागर देशमुख (अपक्ष) 51
प्रशांत सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)446
प्रभाग क्र. 7 अ) सागर कोथमिरे (सेना उबाठा) 1007 विजयी
अजय तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस) 550
शंकर दोडके (शिवसेना) 175
नितीन परदेशी (भाजप) 505
प्रभाग क्र. 7 ब) अंबिका धनगर (सेना उबाठा) 950 विजयी
वनिता पाबळे (शिवसेना) 207
शांताबाई पाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस) 500
शोभा शितोळे (भाजप) 534
रोहिणी जाधव (अपक्ष) 47
प्रभाग क्र. 8 अ) संध्या कासार (सेना उबाठा) 1435 विजयी
जयश्री भगत (राष्ट्रवादी काँग्रेस) 870
प्रियंका बोर्हाडे (भाजप) 777
प्रभाग क्र. 8 ब) हर्षद देशमुख (राष्ट्रवादी) 2149 विजयी
शुभम येलमामे (भाजप)297
प्रशांत रायते (शिवसेना उबाठा) 642
प्रभाग क्र. 9 अ) ललिता हांडे (राष्ट्रवादी) 1424 विजयी
वनिता गोजरे (शिवसेना उबाठा) 628
श्रध्दा भडांगे (भाजप)187
पुजा लोंढे (शिवसेना) 116
प्रभाग क्र. 9 ब) अजय गोजरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
1718 विजयी
पवन जाधव (शिवसेना) 89
संतोष तुंगार (शिवसेना उबाठा) 538
प्रभाग क्र. 10 अ) आशा कर्पे (भाजप) 1161 विजयी
शुभांगी गुळे (शिवसेना उबाठा) 1115
मंदाकिनी कर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस) 381
प्रभाग क्र. 10 ब) अनिल सरवार(भाजप) 1728 विजयी
सोमनाथ पावसे (शिवसेना उबाठा) 1166
अक्षय चकोर (अपक्ष) 23
प्रभाग क्र. 11 अ) कमळबाई पगार (सेना उबाठा)1125 विजयी
वैशाली वराडे (राष्ट्रवादी काँग्रेस)942
लता सातारकर (भाजप) 377
प्रभाग क्र. 11 ब) शुभम वारुंगसे (सेना उबाठा)1074 विजयी
किरण गोजरे(राष्ट्रवादी काँग्रेस)914
अनिल नागरे (भाजप) 450
प्रभाग क्र. 12 अ) सुदर्शन नाईक (राष्ट्रवादी)1443 विजयी
सागर मुत्रक (शिवसेना उबाठा) 826
अमोल खैरनार (भाजपा) 370
प्रभाग क्र. 12 ब) निशा बोडके (सेना उबाठा)1176 विजयी
कोमल मोगल (राष्ट्रवादी काँग्रेस)988
कल्पना आव्हाड (भाजप) 458
प्रभाग क्र. 13 अ) अमोल झगडे (सेना उबाठा)1132 विजयी
विजय झगडे (राष्ट्रवादी काँग्रेस)587
किरण लोणारे (शिवसेना) 207
निलेश लोणारे (भाजप) 444
शरद लोणारे (अपक्ष) 35
प्रभाग क्र. 13 ब) योगिता वरंदळ (राष्ट्रवादी) 878 विजयी
योगिता झगडे (शिवसेना) 242
अनुराधा वरंदळ (भाजपा) 711
संगिता लोणारे (शिवसेना उबाठा) 552
प्रभाग क्र. 14 अ) पंकज मोरे (शिवसेना उबाठा)1741 विजयी
सचिन देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस)160
वेदांत काळे (भाजप) 165
प्रभाग क्र. 14 ब) ज्योती मोरे (सेना उबाठा)1534 विजयी
शीतल विसे (राष्ट्रवादी काँग्रेस) 531
प्रभाग क्र. 15 अ) विलास जाधव (राष्ट्रवादी)645 विजयी
ऋषीकेश नाईक (शिवसेना) 115
आकाश बरडे (भाजपा) 191
रुपेश मुठे (शिवसेना उबाठा) 481
प्रभाग क्र. 15 ब) सुवर्णा उबाळे (राष्ट्रवादी काँग्रेस) 856 विजयी
प्राजक्ता दराडे (शिवसेना उबाठा) 350
मनिषा रेवगडे (भाजपा) 226

