Nashik Housing Scam | नाशिक गृहनिर्माण प्रकरणात १९७ आरोपींवर गुन्हे दाखल; शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत माहिती

Shambhuraj Desai | महसूल विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित आरोपींची नावे समोर आली आहेत
Shambhuraj Desai
शंभूराज देसाई(File Photo)
Published on
Updated on

Nashik housing case 197 accused

नाशिक : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात तब्बल १९७ आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास प्राधान्याने सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या संदर्भात सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी सांगितले की, महानगरपालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) किमान २० टक्के सदनिका राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिकमधील काही विकासकांनी या नियमाला विरोध दर्शवत म्हाडाच्या हिश्श्यातील सदनिका व भूखंड देण्यास टाळाटाळ केली.

Shambhuraj Desai
Air Quality Index Nashik | हवामान बदल अन् वाढते प्रदूषण जागतिक समस्या

या प्रकरणी महसूल विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित आरोपींची नावे समोर आली आहेत. यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत गुन्हे दाखल केले असून तपास प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.

मंत्री देसाई यांनी पुढे सांगितले की, नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्याशी या प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. आरोपींची पडताळणी, त्यांच्यावर लागू असलेल्या कलमानुसार अटक प्रक्रिया तसेच इतर सर्व कायदेशीर बाबी सर्वोच्च प्राधान्याने हाताळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Shambhuraj Desai
Pune Nashik Highway Accident: मंचरजवळ भीषण अपघात; पिंपरीतील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

दरम्यान, या कारवाईमुळे गृहनिर्माण क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर मोठा धाक निर्माण होणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या हक्काच्या घरांसाठी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news