Air Quality Index Nashik | हवामान बदल अन् वाढते प्रदूषण जागतिक समस्या

Air Quality Index Nashik | उपाययोजना आहेत, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती देण्याची गरज
Mumbai air quality update
Mumbai air quality updatePudhari
Published on
Updated on

नाशिक : धनराज माळी

हवामान बदल आणि वाढते प्रदूषण ही आजच्या काळातील सर्वात गंभीर जागतिक समस्या झालेली आहे. याचा परिणाम जगभरात तसेच भारतात आरोग्य, शेती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर स्पष्टपणे दिसून येतो. पर्यावरण संतुलनासाठी तज्ज्ञांकडून अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत.

Mumbai air quality update
Ashok Kharat Foreign Trip | भारतात 'गुरू' अन् विदेशात 'पंटर'! भोंदू खरातचा दक्षिण कोरियातील लक्झरी अवतार व्हायरल

मात्र त्यांच्या अंमल बजावणीला प्रत्यक्षात गती देणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात एकही शहर पूर्णपणे स्वच्छ नाही, ही चिंताजनक बाब आहे. हवामान बदल आणि प्रक्षण ही केवळ पर्यावरणाची समस्या नसून, ती मानवी अस्तित्वाशी संबंधित गंभीर बाब आहे.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारसोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. हवामान बदल व प्रदूषण वाढती गंभीरता गेल्या काही दशकांत औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाहनांची वाढ यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढले. त्यामुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत असून हवामानातील अनियमितता वाढली आहे.

बेमोसमी पाऊस अन् शेतीचे नुकसान बेमोसमी पाऊस हाही हवामान बदलाचा प्रकार आहे. हवामानातील अनियमितता आणि नैसर्गिक असमतोलपणामुळे वातावरणात बदल होऊन पाऊस पडतो.

त्यामुळे उन्हाळ्यातही पाऊस पडत असल्यामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे. हे कळेनासे झाले आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांवर मोठा परिणाम करतो. सध्याच्या नाशिक जिल्ह्याला वातावरणातील बदलामुळे द्राक्ष व कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, त्याचा परिणाम आरोग्यावरही झालेला जाणवतो. थंडी, ताप, सर्दी, खोकला हे आजार डोके वर काढतात.

औद्योगिक क्षेत्रामुळे प्रदूषण

  • भिवंडी : AQI सुमारे १९०-२१० (Severe/Unhealthy)

  • नागपूर : PM² २.५ पातळी ३०० Jg/mH पर्यंत नोंद

प्रदूषणाची कारणे

  • वाहनांची वाढ (डिझेल वाहने)

  • औद्योगिक उत्सर्जन,

  • बांधकामातून होणारी धूळ

  • शेतीतील पिकांची जाळपोळ

  • कोळशावर आधारित वीजनिर्मिती

Mumbai air quality update
Nashik Crime News | धक्कादायक घटना! कालव्यामध्ये उडी घेत तीन मुलांसह पित्याने संपवले जीवन

मध्यम हवा असलेली शहरे

मुंबई, पुणे, नवी मुंबई हे मोठी शहरे असल्यामुळे प्रक्षण आहे, पण काही प्रमाणात नियंत्रणात आहे.

तुलनेने स्वच्छ (चांगली हवा असलेली) शहरे

अमरावती, अकोला, भुसावळ व सांगली.

काही अहवालांनुसार राज्यातील तुलनेने स्वच्छ हवा

या शहरांमध्ये उद्योग कमी व लोकसंख्या कमी असल्यामुळे हवा तुलनेने चांगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news