Nashik Grape export | द्राक्ष निर्यातीला युद्धाचा कडवट विळखा

गतवर्षापेक्षा १५ हजार मेट्रिक टनांची घट; द्राक्ष उद्योग दुहेरी संकटात
Grape Export News
Grape Export NewsPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : निसर्गाची अवकृपा आणि आता आंतराष्ट्रीय युद्धाची ठिणगी असा दुहेरी संकटात नाशिकचा द्राक्ष उद्योग सापडला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उत्पादन घटले असतानाच, आता इराण-अमेरिका बुद्धाचा निर्यातीवर थेट आणि मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दाक्ष निर्यातीत तब्बल १५.२११ मेट्रिक टनची घट नोंदविण्यात आली आहे. गतवर्षी ११ हजार २० कंटेनरद्वारे १ लाख ५५ हजार ९६९ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती.

यंदा २५ एप्रिलअखेर ८ हजार ३८२ कंटेनरद्वारे एक लाख ४० हजार ७४९ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात आल्याची नोंद आहे. भारत प्रामुख्याने नेदरलँड्स, ब्रिटन आणि जर्मनीनंतर संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या आखाती देशांना मोठ्या प्रमाणावर दाचे निर्यात करतो.

Grape Export News
Nashik | साधुग्रामसाठी १९२ एकरचा प्रस्ताव शासनाकडे

विदेशी व्यापार महासंचालनालय आणि अपेडाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा बाटा तब्बल ७० टक्के आहे. या आकडेवारीवरून वैशिष्ट्यपूर्ण पय, अकृष्ट गुणवत्ता आणि जागतिक दर्जाच्या निकषांमुळे नाशिकच्या द्राक्षांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान अधोरेखित होते.

द्राक्ष निर्यातीत आघाडीवर असलेला जिल्हा यंदाच्या वर्षी पिछाडीवर पडला असल्याचे दिसून येत आहे. २०२४-२५ या हंगामात युरोपात ८ हजार १५७कंटेनरद्वारा १ लाख १० हजार २२.५४६ मेट्रिक टन, तर युरोप वगळता, इतर देशांत २८६३ कंटेनरद्वारे ४५ हजार ९३८.६९८ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती.

Grape Export News
Nashik zilla Parishad - जि.प.चे तीन अधिकारी लाच घेताना ताब्यात

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुरोपात ५,६५१ कंटेनरद्वारे ७८ हजार ५६६.५३३ मेट्रिक टन, तर युरोप वगळता, इतर देशांत २,७३९ कंटेनरद्वारे ६२ हवार १८३.०४७ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असल्याची नोंद आहे. गत वर्षीच्या तुलनेत गात २३ हजार मेट्रिक हनने घट झाली आहे.

निर्यातीत घट होण्याची कारणे

मागील वर्षी लांबलेला मान्सूर, अखेरच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे मालाचा दर्जा आणि उत्पादन दीन्हीही घटले, निर्यातीसाची अडचणी निर्माण झाल्याने शेतक-यांनी आपला माल स्थानिक बाजारपेठेत विकण्याला प्राधान्य दिले. निर्यातीच्या अंतिम टप्प्यात इराण अमेरिका संघर्ष सुरू झाला, त्यामुळे आखाती देशांकडे जाणारी निर्यात ठप्प झाली. परिणामी निर्मातीत मोठी पट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news