

सिडको (नाशिक ) : गॅस गिझरचा भडका झाल्याने 42 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष चौधरी (वय ४२, रा. कम्फर्ट झोन सोसायटी, अंबड) हे २६ ऑक्टोबरला संध्याकाळी सातच्या सुमारास गावाहून आले.
हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये त्यांनी गिझर चालू केले व याचवेळी गॅस गिझरचा भडका उडाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा एक नोव्हेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या पक्षात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.