Nashik Garbage Collection | दिवाळीत नाशिककरांकडून 13 हजार 538 टन कचरा

Nashik Garbage Collection | पंधरा दिवसातील संकलन; 4 नोव्हेंबरला सर्वाधिक 966 टन कचऱ्याची नोंद
Garbage
GarbagePudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक (पुढारी वृत्तसेवा): दिवाळीनिमित्त बाजारपेठांमधील खरेदी-विक्री, व्यावसायिक उलाढाल आणि घराघरांमध्ये झालेल्या साफसफाईमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्माण झाला. गेल्या पंधरा दिवसांत नाशिककरांनी तब्बल १३ हजार ५३८ टन कचरा निर्माण केल्याची नोंद मनपाच्या घनकचरा संकलनाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

Garbage
Nashik Weather Update | नाशिक जिल्ह्यात थंडीचा प्रभाव वाढला; पहाटे गारठा तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका

या कालावधीत ४ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९६६ टन कचरा संकलित करण्यात आला. दिवाळी संपल्यानंतर सुट्ट्यांचा माहोल असल्याने शहरातील स्वच्छताव्यवस्थाणावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. मुख्य रस्ते आणि बाजारपेठांची स्वच्छता होत असली, तरी कॉलनी, नगरे आणि छोट्या सोसायट्यांमधील अंतर्गत रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अस्वच्छतेचे चित्र कायम आहे.

महापालिकेच्या २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या घनकचरा संकलनाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत एकूण १३ हजार ५३८ टन कचरा जमा झाला. २८ ऑक्टोबर रोजी शहरातून ९२३ टन कचरा संकलित करण्यात आला होता. २९ ऑक्टोबरला ८९६ टन, ३० ऑक्टोबरला ८९२ टन, तर ३१ ऑक्टोबरला ८८९ टन कचऱ्याची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कचऱ्याचे प्रमाण पुन्हा वाढले. २ नोव्हेंबर रोजी ९६१ टन, तर ४ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९६६ टन कचरा संकलित करण्यात आला.

५ नोव्हेंबर रोजीही ९५१ टन कचरा जमा झाला. त्यानंतर कचरा संकलनाच्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले. ८ नोव्हेंबर रोजी ८७३ टन, ९ नोव्हेंबरला ८४२ टन, तर १० नोव्हेंबर रोजी पुन्हा वाढ होऊन ९१७ टन कचरा संकलित झाला.

मात्र, ११ नोव्हेंबर रोजी हे प्रमाण अचानक घसरून ७६२ टनांवर आले. दिवाळीच्या काळात बाजारपेठा, निवासी परिसर आणि व्यावसायिक आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असताना संकलनाच्या प्रमाणात झालेली ही घट लक्षवेधी ठरली आहे.

Garbage
Kidnapping Suspect Arrested | अल्पवयीनचे अपहरण; संशयित जाळ्यात, नाशिक पोलिसांची कामगिरी

दुर्गंधी, डासांच्या प्रादुर्भावात वाढ

दिवाळी संपल्यानंतर शहरातील स्वच्छताचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. महापालिकेमार्फत स्वच्छतेचे काम सुरू असल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात अनेक निवासी भागांमध्ये स्वच्छतेची स्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये नियमित साफसफाई होत असली, तरी कॉलनी, नगरे आणि छोट्या सोसायट्यांमधील अंतर्गत रस्त्याकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

अनेक ठिकाणी रस्त्यांची झाडलोट नियमित होत नसल्याने कचरा साचून राहत आहे. मोकळ्या जागा, नाल्यांच्या कडेला तसेच रस्त्यांच्या कोपऱ्यांमध्ये कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. काही भागात कचरा वेळेवर उचलला जात नसून परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांच्या प्रादुर्भावाही वाढत आहे. परिणामी नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.