Nashik Water Supply | नाशिककरांना नव्या जलवाहिनीतून पाणी मिळणार कधी? नवीन वर्षापर्यंत प्रतीक्षा

Nashik Water Supply | नाशिकच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कधी सुटणार? नव्या जलवाहिनीसाठी डिसेंबरअखेरची प्रतीक्षा
Water
Water Pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वारंवार मुदतवाढ देऊनही गंगापूर धरण थेट जलवाहिनीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. ठेकेदाराला दिलेली १४ नोव्हेंबरची अंतिम मुदतही उलटली असून, अद्यापही बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रातील या जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनच्या कामाला मुहूर्त लाभलेला नाही. त्यामुळे या वर्षात या जलवाहिनीद्वारे नाशिककरांना पाणीपुरवठ्याचे स्वप्न भंगले आहे. चाचणीसाठी आणखी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने या जलवाहिनीद्वारे नाशिककरांना आता नवीन वर्षातच पाणीपुरवठा होऊ शकेल.

Water
Nida Khan Divorce Case | निदा खान घटस्फोट प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी; नाशिक कौटुंबिक न्यायालयात काय घडणार?

गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान २००३ मध्ये टाकण्यात आलेली सिमेंटची जलवाहिनी वारंवार नादुरुस्त होत असल्याने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २०० कोटींच्या खर्चातून नवीन लोखंडी थेट जलवाहिनी टाकण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. सध्यास्थितीत जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, बारा बंगला परिसरातील झोपडपट्टी बाधित होऊ नये, यासाठी जलवाहिनीचा मार्ग बदलण्यात आल्याने या कामाला विलंब झाला.

जलशुद्धीकरण केंद्रालगतचे क्रॉस कनेक्शनचे काम अद्याप अपूर्ण आहे. जलवाहिनीचे काम मुदतवाढीच्या फेऱ्यात अडकले आहे. महापालिकेने सर्वप्रथम सप्टेंबर २०२५ मध्ये संबंधित ठेकेदाराला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, मुदतवाढीनंतरही काम पूर्ण न झाल्याने १ मेपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. दि. १ ते १५ मे या कालावधीत दररोज एक लाख रुपये, तर १६ मेपासून दररोज अडीच लाख रुपये दंड आकारण्यात येत आहे.

Water
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

या कारवाईतून चार कोटी २२ लाख २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. पाणीपुरवठा विभागाने दि. १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली. मात्र, या मुदतीतही जलवाहिनीचे काम पूर्णत्वास आलेले नाही.

जलवाहिनीची चाचणी टप्प्याटप्प्याने

नव्या गंगापूर धरण थेट जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. १२.५० किमी.पैकी ६.४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. संपूर्ण जलवाहिनी चाचणीला आणखी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे नवीन वर्षातच नव्या जलवाहिनीद्वारे नाशिककरांना पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

गंगापूर थेट जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया दिवाळीनंतर सुरू करण्यात आली आहे. उर्वरित चाचणी प्रक्रियेला तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

ठेकेदाराला पाच कोटींचा दंड

ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नसल्याने दि. १ ते १५ मे या कालावधीत ठेकेदाराला दररोज एक लाख रुपये, तर दि. १६ मेपासून दररोज अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत चार कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठेकेदाराला केला आहे. या दंडाची रक्कम ठेकेदाराच्या देयकातून वसूल करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.