Nashik Ganeshotsav | पावसाची उसंत अन् नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; देखावे पाहण्यासाठी रस्त्यांवर गर्दीचा महापूर!

Nashik Ganeshotsav | शहरात पावसाची उसंत : सुट्टीमुळे सायंकाळी फुलले रस्ते
Nashik Ganeshotsav
Nashik Ganeshotsav
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाने काही काळ उसंत घेतल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण आले आहे. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी साकारलेल्या आकर्षक आरास व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळाच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची पर्वा न करता गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Nashik Ganeshotsav
Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याचे होणार 100 % दस्तऐवजीकरण; कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांची घोषणा!

यंदा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक कथांसह सामाजिक आणि जनजागृतीपर विषयांना प्राधान्य दिले आहे. विविध मंडळांनी साकारलेले देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोदावरी प्रदूषण, पर्यावरण संवर्धन यांसह विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर आधारित देखावे साकारण्यात आले आहेत. घरगुती गणेश आरासदेखील पर्यावरणपूरक संकल्पनांना प्राधान्य दिले आहे.
गणेशोत्सवानिमित्त बी. डी. भालेकर मैदान परिसराला देखील जत्रेचे स्वरूप आले आहे. मैदानावरील पारंपरिक आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. येथील गणेशोत्सव मंडळाने साकारलेला 'समुद्रमंथन' हा देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

त्याचबरोबर गोदावरी प्रदूषणावर आधारित देखावा, ५१ फूट उंचीचे भव्य शिवलिंग तसेच ६० फूट उंचीच्या जगन्नाथ मंदिराची पर्यावरणपूरक प्रतिकृती, नाशिकरोड येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

नाशिक गणेशोत्सवातील प्रमुख देखावे व आकर्षणे

देखावा / विषयमुख्य वैशिष्ट्ये व ठिकाण समुद्रमंथन देखावाबी. डी. भालेकर मैदान परिसर ५१ फूट भव्य शिवलिंगभाविकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू ६० फूट जगन्नाथ मंदिर प्रतिकृती पर्यावरणपूरक भव्य प्रतिकृती निर्माण सामाजिक व पर्यावरण संदेशगोदावरी नदी प्रदूषण मुक्ती व पर्यावरण संवर्धन संकल्पना नाशिक रोड विशेषनाशिकरोड येथे ज्योतिर्लिंग दर्शन देखावा

Nashik Ganeshotsav
Sindhudurg|कार चालकावर हल्ला करणारे तिघेजण नाशिक येथून जेरबंद! सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा काढला माग

देखाव्यांसोबत सेल्फीचा मोह

सायंकाळ होताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची वर्दळ वाढत आहे. विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी कुटुंबांसह नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. बालगोपाळांसाठी देखावे आणि आकर्षक आरास करमणुकीचा विषय ठरत आहे.

अनेक भाविक देखाव्यांसोबत सेल्फी घेत असून गणेश आरास कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील रस्ते सायंकाळनंतर भाविकांनी फुलून जात आहेत. (छायाचित्र वर्णन: नाशिक : गणेशोत्सवात शनिवारी (दि. १९) देखावे पाहण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी. फोटो: हेमंत घोरपडे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news