

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेळेत आरटीजीएस करूनही पुरवठा होत नाही, असा आरोप पंपचालकांनी केला. त्यामुळे तेल कंपनी व पेट्रोल पंपचालकांच्या वादात सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचे समोर येत आहे. या वादावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढून लवकरात लवकर इंधनपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे बैठकीत करण्यात आली. यावेळी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पंपचालक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले.
पानेवाडी डेपोमध्ये इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असा दावा वारंवार जिल्हा प्रशासन करीत असले, तरी जिल्ह्यात पेट्रोल - डिझेल शिल्लक नसल्याचे फलक झळकत आहेत. इंधन तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, इंधन साठा संपल्याच्या अफवेमुळे इंधन घेण्यासाठी गेल्या चार पाच दिवसांपासून रांगा पाहायला मिळत आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. त्यानंतर लगेचच शुक्रवारी (दि. २२) पेट्रोल पंपचालकांचीही बैठक घेतली. असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे, उपाध्यक्ष यांच्यासह पेट्रोल पंपचालक उपस्थित होते. गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात इंधनपुरवठा विस्कळीत झालेला आहे.
डिझेल पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने केवळ कर मोि ७६ माग चोन आ अन केल आ शा बज उप सिज आ प्रश प्रग दिव उन्ह बैठकांचे सोपस्कार पूर्ण न करता तेल कंपन्या आणि पेट्रोल पंपचालकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित इंधनपुरवठा करावा, अशी मागणी होत असून जोपर्यंत पंपचालक व तेल कंपन्याव्यासपीठावर येऊन मार्ग काढत नाहीत, तोपर्यंत इंधन तुटवड्याचा फटका नागरिकांनाच बसणार, हे स्पष्ट आहे.
तेल कंपन्यांचा आरोप
पंपचालक आगाऊ आरटीजीएस करत नाहीत. ऑर्डर दिल्यानंतर पैसे जमा होण्यास विलंब होतो. त्यामुळे लोडिंगला उशीर होतो आणि पुरवठा साखळी तुटते. वेळेत पेमेंट झाले, तर २४ तासांत टँकर पोहोचतो.
पंपचालकांचा पलटवार
आम्ही आरटीजीएस व आगाऊ पेमेंट करूनही तीन ते चार दिवसांपर्यंत पेट्रोल - डिझेलचा पुरवठा मिळत नाही. पैसे आगाऊ जमा असतानाही टैंकर वेळेत येत नसल्याने पंप कोरडे होत आहेत. त्यामुळे तुटवड्याला तेल कंपन्याच जबाबदार आहेत, असे स्पष्टीकरण नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने शुक्रवारच्या बैठकीत दिले.
काही पेट्रोल पंपचालक पंप ड्राय झाल्यानंतर आरटीजीएस 66 करतात. त्यामुळे टँकर येण्यास १२ ते १८ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे टँकरचे नियोजनदेखील विस्कळीत होते. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लवकरात लवकर इंधनपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गरज पडल्यास पानेवाडी डेपोला भेट देऊन आढावा घेतला जाईल.
- रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक