Bhondoo Ashok Kharat Nashik | भोंदू अशोक खरातचा ताबा आता ईडीकडे

Bhondoo Ashok Kharat Nashik | कोट्यवधींच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी
Ashok Kharat
Ashok KharatPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरातचा ताबा अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घेतला. मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ च्या सुमारास ईडीचे विशेष पथक आणि पोलिस बंदोबस्तात अशोक खरातला नाशिकहून मुंबईकडे रवाना करण्यात आले.

Ashok Kharat
Nashik MLC Election | शिंदे शिवसेना-भाजपत रस्सीखेच

त्याला मुंबईतील ईडी न्यायालयात हजर करून ईडी कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भोंदू खरात हा महिला लैंगिक शोषण, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित तब्बल १८ गुन्ह्यांमध्ये अटकेत असून, तो १८ मार्चपासून विविध तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात अनेक महिलांनी गंभीर आरोप करीत तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांची संशयित मालमत्ता, बेहिशेबी आर्थिक व्यवहार, बेकायदेशीर संपत्ती उभारणी आणि विविध आर्थिक गुंतवणुकीबाबत तपास सुरू आहे.

Ashok Kharat
Nashik Zilla Parishad | सीईओ आल्या पायी, तर अधिकारी सार्वजनिक वाहनांनी

खरातच्या नावावर तसेच निकटवर्तीयांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मालमत्तेच्या आर्थिक स्रोतांचा तपास करण्यासाठी ईडीने वेगाने हालचाली सुरू केल्याचे समजते. अशोक खरात हा सिन्नर पोलिसांच्य ताब्यात होता. त्याला न्यायालयाने सोमवा (दि. १८) न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंत दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळ त्याला अधिकृतरीत्या ईडी पथकाच्या स्वाधी करण्यात आले. मुंबईत त्याच्या आर्थिक व्यवहारां दस्तावेज, बँक व्यवहार, कथित बेनाम मालमत्ता तसेच आर्थिक फायद्यासा उभारलेल्या व्यवहारांची कसून चौकशी होण असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुन प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याच शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news