

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - अशोक स्तंभ परिसरातील रविवार पेठ जुन्या वाड्याला रविवार (दि.1) शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
रविवार (दि.1) पहाटे सुमारे साडेपाचच्या सुमारास अशोक स्तंभ परिसरातील रविवार पेठ येथील घर नंबर 439 व 440 जुना वाड्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. प्रसंगावधान होत रहिवाशांच्या सतर्कतेने अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने व चार बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. वाड्यात कोणीही राहत नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही, याबाबत सरकार वाडा पोलीस कर्मचारी अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरातील ऐतिहासिक जुन्या वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.