Nashik News | रेल्वेमार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

Nashik Railway Land Acquisition Protest- रेल्वेमंत्र्यांसोबत बैठकीची मागणी, मोजणी रोखणार
Nashik Railway Land Acquisition Protest
मालेगाव मनमाड इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्प भूसंपादनासंदर्भात आयोजित बैठकीत प्रशासकीर अधिकारी, शेतकरी आदी
Published on: 
Updated on: 

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

भनमाड - इंदूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादनाला सहकार्य करणार नाही, अशी ठाम भूमिका मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. बागायती जमिनींचे जिरायती म्हणून वर्गीकरण केले जात असल्याचा आरोप करीत प्रत्यक्ष बाजारभावानुसार मोबदला निश्चित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच रेल्वेमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची प्रत्यक्ष बैठक आयोजित करावी. ही बैठक आणि मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संयुक्त मोजणी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Nashik Railway Land Acquisition Protest
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

येथील अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातील सुसंवाद हॉल मध्ये सोमवारी (दि. २३) अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या उपस्थितीत रेल्वे भूसंपादन अधिकारी आणि पोलिस विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तालुक्यातील रेल्वेमार्ग बाधित गावांमधील शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेतील त्रुटी आणि मोबदल्याच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला.

Nashik Railway Land Acquisition Protest
IFFI Goa| नाशिक आणि नागपूरमध्ये लवकरच नवी 'फिल्म सिटी' होणार

रेल्वेमार्गामुळे दळणवळण, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळणार असेल, तर त्यावे स्वागतच आहे. मात्र, विकासाचा भार केवळ शेतकऱ्यांनीच का सोसायचा, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडली. आयुष्यभर कष्ट करून, कर्ज काढून विहिरी, बोअरवेल आणि फळबागा उभ्या केल्या आहेत. अशा जमिनींचे मूल्य केवळ कागदोपत्री दरांवर ठरविणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

रेडरिकनरच्या दरानुसार मोबदला निश्चित करण्यास शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. जमिनीचे प्रत्यक्ष बाजारमूल्य विचारात घेऊन भरपाई द्यावी, बागायती जमिनींचे योग्य वर्गीकरण करावे तसेच विहिरी, बोअरवेल, फळबागा आणि अन्य मालमतांचे प्रत्यक्ष जागेवर मूल्यांकन करावे, अशी मागणी केली. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास, भूसंपादन प्रक्रियेला सहकार्य करणार नसल्याचा निर्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने रेल्वेमार्गाच्या कामापुढील मोबदल्याचा पेच कायम असल्याचे चित्र आहे.

कष्टाचा सन्मान राखावा

रेल्वेमंत्र्यांसोबत बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करून जमिनीचे दर आणि भरपाईचा प्रश्न निकाली काढावा. त्यानंतरच भूसंपादनाची पुढील प्रक्रिया राबवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला आणि त्यांच्या कष्टांचा सन्मान राखला पाहिजे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली

आश्वासन नको, ठोस निर्णय व लेखी हमी द्यावी !

जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून शेतक-यांशी संवाद साधत राष्ट्रीय प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासनही दिल्याचे समजते. मात्र, केवळ आश्वासनांऐवजी मोबदल्याबाबत ठोस निर्णय आणि लेखी हमी मिळावी, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.