वडिलांचे आशीर्वाद घेताच फुटला अश्रूचा बांध

प्रकाशभाऊ वाजे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भेटीने कार्यकर्ते भावुक
सिन्नर : येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर वडील प्रकाशभाऊ वाजे यांची भेट घेताना खासदार राजाभाऊ वाजे.
सिन्नर : येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर वडील प्रकाशभाऊ वाजे यांची भेट घेताना खासदार राजाभाऊ वाजे.
Published on
Updated on

Father's Blessings Emotional Moment

सिन्नर : राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, दूरदृष्टी आणि संयम यांचा वारसा जपणारे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे आणि पक्षनिष्ठेचा आदर्श निर्माण करणारे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भेटीचा भावनिक क्षण सिन्नरकरांना अनुभवायला मिळाला. खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवासस्थानी पोहोचल्यानंतर वडील प्रकाशभाऊ वाजे यांचे आशीर्वाद घेतले. मुत्सद्दी पिता आणि कर्तृत्ववान, निष्ठावान पुत्र यांच्या या भेटीने उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना दाटून आल्या.

राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये आगमन होताच, कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सिन्नर : येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर वडील प्रकाशभाऊ वाजे यांची भेट घेताना खासदार राजाभाऊ वाजे.
Colored Stork Spotted | खडक माळेगाव धरणावर आढळला रंगीत करकोचा

निवासस्थानी झालेल्या भेटीत पिता - पुत्रांमधील आत्मीय संवाद आणि आशीर्वादाचा प्रसंग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. राजकीय निष्ठा, संस्कार आणि कुटुंबीय मूल्यांची जपणूक करणारा हा क्षण उपस्थित शिवसैनिकांनी आपल्या डोळ्यांत साठवून ठेवला. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद चोथवे, सरदवाडीचे माजी सरपंच भजनाथ शिरसाठ यांच्यासह शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिन्नर : येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर वडील प्रकाशभाऊ वाजे यांची भेट घेताना खासदार राजाभाऊ वाजे.
Nashik Encroachment Removal | जुन्या नाशिकमध्ये दुकानदारांनी स्वतःहून काढली अतिक्रमणे

कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या स्वागतामुळे सिन्नरमधील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. खासदार वाजे यांनी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध राजकीय व संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीस शहरप्रमुख गौरव घरटे, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सोमनाथ वाघ, नगरसेवक पंकज मोरे, अमोल झगडे, पिराजी पवार, वैभव मुत्रक, उदय गोळेसर, सागर कोथमिरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news