Nashik dog attack | एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १३ पेक्षा अधिक जणांना चावा, एका व्यक्तीवर माकडाचाही हल्ला

नागरिकांनी लहान मुलांना एकटे बाहेर न पाठविण्याचे तसेच संशयास्पद प्राण्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Dog Attack
Dog AttackPudhari
Published on
Updated on

वणी : शहरातील संस्कृती नगर, दत्त नगर आणि शंखेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी (दि.१९ जुन) २६ रोजी सायंकाळी पिसाळलेल्या तांबड्या रंगाच्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालता. त्याने १३ पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका व्यक्तीला माकडानेही चावा घेतल्याची घटना घडली.

सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक, रस्त्यावर खेळणारी लहान मुले तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कुत्र्याने अचानक हल्ले चढवले. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी घरा बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.

Dog Attack
Renapur stray dogs menace : रेणापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

जखमींमध्ये संदीप रामा बोंबले (वय ३९, रा. औताळे), गौरव परशराम चौधरी (वय ३५), लौकीक समदडिया (वय २३), मुमताज अन्सारी (वय ४८), रोहित गुलाब गायकवाड (वय १८), शांताराम गांगुर्डे (वय ५१), लताबाई प्रभाकर शेलार (वय ६५), ललिता भोई (वय २८), प्रिया खडताळे (वय ७), रामदास किसन गावित (वय ३५), अमोल अशोक कुंवर (वय २९), अथर्व किशोर सोनवणे (वय २३) यांच्यासह अन्य काही नागरिकांचा समावेश आहे. रात्री आठ वाजेपर्यंत जखमी नागरिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होते.

Dog Attack
Paranda Dog Attack | जनगणना कर्मचाऱ्यावर कुत्र्यांचा हल्ला; बचाव करताना पडल्‍याने पाय ‘फ्रॅक्‍चर’

सर्व जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन मिसाळ तसेच वैद्यकीय कर्मचारी यांनी तत्काळ उपचार सुरू केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेत पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू केला असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी लहान मुलांना एकटे बाहेर न पाठविण्याचे तसेच संशयास्पद प्राण्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news